दारूचे पैसे न दिल्याने झाला वाद चाकूने वार करून केला गेम

61

*दारूचे पैसे न दिल्याने झाला वाद चाकूने वार करून केला गेम*

सुबोध आणि प्रणयमध्ये दारुच्या पैसा करिता वाद सुरु होता. प्रणयने आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने सुबोधचा काटा काढण्याचा कट आखला. त्याने शुक्रवारी मध्यरात्री सुबोधला गाठलं आणि त्याच्यावर चाकूने वार केले.

*नागपूर:- प्रशांत जगताप:* आज नागपुरचा क्राईम रेट मोट्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो. काय नागपुरात आता पोलिसांची भीती राहलेली नाही अशी ओरड आम जनता करीत आहे. सर्वी कळे रक्तपात सुरु आहे. पोलिस कधी या गुन्हेगारी वर अंकुश लावणार. चाकूने गळा कापून २२ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना मांजरी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली.
सुबोध ऊर्फ बापू विशाल मेश्राम (वय २२, रा. पाटील लेआउट, मांजरी) असे मृताचे नाव आहे. दारूच्या पैशांच्या वादातून सुबोधची हत्या करण्यात आली. यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. प्रणय ऊर्फ गोलू राऊत (वय २२), सागर परिमल (वय २०) आणि अभिषेक चौधरी (सर्व रा. मांजरी) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.
लॉकडाउनमुळे प्रणयचा कॅटरिंगचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे तो अवैध दारूविक्री करायला लागला. सुबोध त्याच्याकडून उधार दारू घ्यायचा. त्याने प्रणयला दारूचे पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद व्हायला लागले. शुक्रवारीही सुबोध व प्रणयचा वाद झाला. प्रणयने साथीदारांच्या मदतीने सुबोधचा काटा काढण्याचा कट आखला. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास प्रणय व त्याच्या साथीदारांनी सुबोधला गाठले. चाकूने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. सुबोधचा मृत्यू झाला. प्रणय व त्याचे साथीदार पसार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.