*आजीच्या अस्थी विसर्जनाला गेलेल्या तिघांना जल समाधी*

*खापरखेडा परिसरातील घटना
आजीच्या अस्थीे विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उतरला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघ नदी बुडाले*

नागपूर:- खापरखेडा गावातील तिघांचा नदी मधे बुडुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार
काल आजीच्या अस्थीे विसर्जन करिता लोक नदी घाटावर गेले होते. अस्ती विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उरतला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले.
तिघांपैकी दोघांचे मृतदेह शोधून काढण्यात बचाव पथकाला यश आले असून, एकाचा थांगपत्ता लागला नाही. तिघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले कोलार येथील कोलार नदीच्या डोहात शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
आकाश राजेंद्र राऊत वय २० व शंतनू ऊर्फ नयन कैलास येडकर वय २० दोघेही रा. रामेश्वरी, नागपूर अशी मृतांची नावे असून, हर्षित राजू येदवान वय २०, रा. रामेश्वरी, नागपूर असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघेही मित्र होत. लहानूबाई सदाशिव सरवरे, रा. रामेश्वरी, नागपूर यांचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी रक्षा विसर्जनासाठी किल्ले कोलार येथे आले होते. यात मनिषा भास्कर जाधव, बंडू सदाशिव सरवरे, शोभा बंडू सरवरे, सुमित बंडू सरवरे, शिवानी बंडू सरवरे, राकेश यादव, कपिल पाल, शुभम रामटेके, प्रणय बोरकर, शंतनू ऊर्फ नयन कैलास येडकर, हर्षित राजू येदवान व आकाश राजेंद्र राऊत या १२ जणांचा समावेश होता.
अस्थी व रक्षा विसर्जन झाल्यानंतर शंतनू कोलार नदीच्या डोहात अंघोळ करण्यासाठी उतरला. गढूळ व शेवाळयुक्त पाणी नाकात गेल्याने त्याला गुदमरल्यागत झाले. तो कसातरी करत असल्याचे लक्षात येताच हर्षित व आकाश त्याच्या मदतीला गेले. त्यांनी शंतनूला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शंतनूसोबत दोघेही बुडाले. त्यामुळे इतरांनी या प्रकाराची माहिती लगेच पोलिसांना दिली. फायर अ‍ॅण्ड रेस्क्यू, एसडीआरएफ व आरपीसीच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
या बचाव पथकांना अंधार होईपर्यंत आकाश व शंतनूचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. हर्षित मात्र गवसला नाही. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. ते रविवारी (दि. २०) सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here