आदिम जमातीच्या विकासाकरिता विविध योजना

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत आदिम जमातीच्या विकासाकरिता शेळी गट वाटप योजना (१० शेळ्या व १ बोकड), औषधी वनस्पतीची लागवड व फलोद्यान, कृषी व पशुपालन प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सिंदेवाही, सावली या तालुक्यांमधील अधिवास असलेल्या कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांकडून या योजनांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या व अटींची पूर्तता करणाऱ्या आदिम जमातीच्या लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह आपले अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे. या योजनेचे अर्ज प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह येथे २० सप्टेंबर या कालावधीत नि:शुल्क उपलब्ध आहेत. शेळी गट वाटप योजना दुर्गम भागातील आदिम जमातीचे कुटुंब शेतमजूर, भूमिहीन असावे, वार्षिक उत्पन्न २० हजारांच्या आत, लाभार्थी कुटुंबाकडे किमान ३०० चौ. मी. स्वतःची जागा असावी, तसेच यापूर्वी लाभार्थी कुटुंबाने अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.