महानगर भाजपाचे कार्यावलोकन पुस्तक अनुसरण करणे योग्य…आ.मुनगंटीवार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सादर केला पक्ष कार्याचा लेखाजोखा

47

महानगर भाजपाचे कार्यावलोकन पुस्तक अनुसरण करणे योग्य…आ.मुनगंटीवार

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सादर केला पक्ष कार्याचा लेखाजोखा

महानगर भाजपाचे कार्यावलोकन पुस्तक अनुसरण करणे योग्य...आ.मुनगंटीवार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सादर केला पक्ष कार्याचा लेखाजोखा
महानगर भाजपाचे कार्यावलोकन पुस्तक अनुसरण करणे योग्य…आ.मुनगंटीवार
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सादर केला पक्ष कार्याचा लेखाजोखा

जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9529811809

चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी हा देशभक्त कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.शेवटच्या माणसाची सेवा करणे हे आमचे ध्येय आहे.कोरोनाच्या संकटात आपण अनेक सेवा प्रकल्प राबविले.सर्वांना मदत केली.महानगर भाजपाने नेत्रदीपक कार्य केले.त्या सर्व कार्याचा लेखाजोखा’कार्यावलोकन 01’या डिजिटल पुस्तकात देण्यात आला आहे.हे पुस्तक सर्व तालुकाध्यक्षांनी अनुसरावे असे आहे.असे प्रतिपादन लोकलेखा समिती प्रमुख आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.
ते प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तर्फे आयोजित कार्यावलोकन 01 या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यात विमोचन करून लोकार्पण करतांना बोलत होते.
यावेळी डॉ.मंगेश गुलवाडे,महापौर
सौ.राखिताई कंचर्लावार,उपमहापौर
राहुल पावडे,मनपा सभापती
रवी आसवानी,भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष
प्रकाश धारणे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,नगरसेवक संदीप आवारी,
तुषार सोम,भाजपा उपाध्यक्ष
छबुताई वैरागडे,
डॉ भारती दुधानी,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,
पूनम गरडवा,
मनोरंजन रॉय,
सपना नामपल्लीवार,
सचिन कोतपल्लीवार,
रवी लोणकर,
संदीप आगलावे,
दिनकर सोमलकर,
विठ्ठल डुकरे,
सूर्यकांत कुचनवार,
रामकुमार आकापेल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी आ मुनगंटीवार यांनी डॉ गुलवाडे यांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. आपण केलेले सेवाकार्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुस्तक हे उत्तम माध्यम असून कार्यावलोकन सारखे पुस्तक पदाधिकाऱ्यांनी तयार केले तर, आपले कार्य नागरिकांपर्यंत सहज पोहचेल व सेवाकार्याची नागरिकांना माहिती मिळेल असे ते म्हणाले.
या कार्यावलोकन पुस्तिकेत जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी मागील एक वर्षात केलेल्या सेवाकार्याचा (3जुलै 20 ते 3 जुलै 2021) लेखाजोखा व भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने एकावर्षात करण्यात आलेल्या सेवा कार्याची संपूर्ण माहिती दिली आहे.हे विशेष.