वरिष्ठांना तक्रार का केली म्हणून आरोग्य सेवकाने शिवसेना महिला पदाधिकाऱ्याला केली अश्लील भाषेत शिवीगाळ

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800
जिवती:- जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथिल मच्छरदाणी वाटप करण्यात आले होते. पण या मच्छरदाणी वाटप करण्यात मोठ्या प्रमाणात पाटण रुग्णालयातील आरोग्य सेवक किन्नाके यांनी भ्रष्टाचार केल्या प्रकरणी सिधुंताई जाधव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडे वरिल प्रकरण्याची चौकशी करण्यासाठी विनंती केली असता, वरिष्ठांना तक्रार दिल्याच्या राग व्यक्त करीत आरोग्य सेवक किन्नाके यांनी सिधुंताई जाधव यांना फोन करून खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याची घटणा १९ सप्टेंबरच्या रात्री १०:०९ वाजता घटली. याबाबत शिवसेना महिला तालुका संघटिका सिधुंताई जाधवने त्या आरोग्य सेवक ला निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडे केली आहे.
जिवती तालुक्यात मच्छरदाणी वाटपात घोळ.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
जिवती, सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की जिवती तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण रुग्णालय चर्चेत आला आहे आज पल्लेझरी येथे आरोग्य सेवक किनाके यांनी मच्छरदाणी वाटप करण्यासाठी आलो होतो, यादी नुसार 313 लोकांना मच्छरदाणी वाटप करायाची होती मात्र पाटण रुग्णालयाचे आरोग्य सेवक किनाके यांनी गावात २५ लोकांनाच मच्छरदाणी वाटप केलले आहेत.
बाकीच्या मच्छरदाणी किनाके यांनी खाजगी कापड दुकानात विकले आहे अशा आरोप शिवसेना तालुका महिला संघटिका यांनी केला होता त्यानंतर आरोग्य सेवक किन्नाके यांनी शिवसेना महिला तालुका संघटिका सिंधुताई जाधव काल रात्री १०:०९ वाजता फोन करून खालच्या दर्जाच्या भाषेत शिवीगाळ केली. हे कृत्य एका आरोग्य सेवक ला अशोभनीय असून माणुसकी नसणार्या अशा निर्दयी आरोग्यसेवकांना नौकरी करण्याचा काही एक अधिकार नाही. अशाच प्रकारे अनेकवेळा आरोग्य सेवक यांनी नागरिकांना वागणूक दिली आहे नागरिकांननी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या नंतरही त्याकडे मात्र गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही.
तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवक किन्नाके याच्या कडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे या महत्त्वाच्या विषयाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर आणि लक्ष न दिल्यास तसेच आरोग्य सेवक किन्नाके यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करुन निलंबित न केल्यास शिवसेना तीव्र स्वरुपाचे शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करेल अशा ही ईशारा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महिला संघटिका सिधुंताई जाधव यांनी सांगितलेे आहे.की या अगोदर असे कधी नाही झाले आणि आता दुकानात विकायचं काय कारण आहे खरे सागावे या प्रकारे सिंधुताईंनी विचारणा केली आहे