मनसेप्रमुख राज ठाकरे चंद्रपुरात

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : तब्बल दहा वर्षानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सोमवार, 19 सप्टेंबरला सायंकाळी चंद्रपुरात आगमन झाले. 20 सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील वकील, सीए, पर्यावरण अभ्यासक, साहित्यिक, उद्योजक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसोबत ते चर्चा करणार आहे. त्यानंतर सायंकाळी ते अमरावतीकडे निघणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौर्याच्या नियोजनाची बैठक शहर कार्यालयात पार पडली.
यावेळी संपर्क अध्यक्ष सचिन भोयर, मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.