माणगांव तालुक्यातील बामणोली नदीपात्राच्या बाजूला एका निवासी सकूळाच्या शेजारी मगरीचा वावर
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव तालुक्यातील बामणोली रोड येथे एका निवासी संकुलाच्या शेजारी ओसाड पावसाच्या पाण्याने भरलेल्या जागेवर मगरीचा वावर असल्याने निर्दशनास आल्याने तिथल्या परिसरात भीतीचे वातावरण पाहावंयास मिळत आहे. वन विभाग खात्याने या परिसरात मगरीपासून सावधानतेचा इशारा देणारा फलक जिल कंपनी शेजारी लावला आहे.
सदर मिळालेल्या माहितीनुसार बामणोली रोड येथे मोकळी जागा ही सखल भागात आहे. त्यामुळे येथे पावसाचे पाणी तुबून राहते त्याचबरोबर या भागात प्रचंड उंच गवत वाढलेले आहे. त्यामुळे मगरीच्या वास्तव्याला हा भाग अनुकूल झाला आहे. असे जरी असले तरी सदर हा भाग वर्दलीचा असल्याने अंधारात लोकांनाही भिती वाटत आहे. सध्या धो-धो पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत नंद्याचे पाणी सखल भागात साचत आहे. त्यामुळे बामणोली ग्रामस्थ व त्या भागातील रहिवासी येणाऱ्या जाणाऱ्यानी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासन यांनी केले आहे.१७ सप्टेंबर रोजी काही मुलांना त्या ठिकाणी छोट्या मगरीचे दर्शन झाले त्यांनी ही बाब सर्वांना सांगितली त्यानंतर वनखाते सर्तक झाले. वनखात्यानी त्या विभागात बॅनर लावून लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.