पाचुंदा वानोळा परीसरात रोह्यांनी घातला हैदोस…

गोपाल नाईक

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

मो: 7499854591

नांदेड: माहुर तालुक्यातील पाचुंदा,वानोळा,पानोळा परीसरासह माळपट्यातील अनेक शेतामध्ये रोही या रानटी प्राण्यांने अक्षरशः हैदोस घातला आहे.या जंगल पट्यामध्ये अनेक रोह्यांचे कळपं अस्तित्वात असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रोह्यांचे कळपं शेतातील उभ्या पिकात शिरुन धान्याची बहरात आलेल्या शेतमालाची नासाडी करत आहे.शेतकरी रात्रदिवस कष्ट करुण शेतात धान्य पिकवण्यासाठी राबतात.मागामोलाचे बियाणे रुजवून पिकं उगवण्याचा प्रयत्न करत असतात.पावसाच्या लहरीपणामुळे कधी दुबार पेरणी,तर कधी अतिवृष्टी,तर कधी गारपीट या सारख्या अस्मानी संकटाचा सामना करत असताना कधी बोगस बियाणे यामुळे शेतकरी पुरता हातघाईला आला आहे. त्यातच या रोह्यांनी या परिसरात धुमाकुळ घातला आहे.

रोह्यांचा बिमोड करण्यासाठी शेतकर्‍यांना रात्र रात्र जागण्याची वेळ आली आहे.या रोह्यापासून आपल्या शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना वेगवेगळ्या उपाययोजना कराव लागत आहे.कळपंच्या कळपं शेतात शिरल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.शेतकरी अक्षरशाः मेटाकुटीला आला असून या प्राण्यांच्या त्रासामुळे शेतरी हतबल झाला आहे.

सततच्या नापिकीमुळे तसेच शेतमालाला मिळणार्‍या अत्याल्प भावामुळे शेतकरी अगोदरच हैराण झालेला असताना त्यात हे नवीनच संकट पाचुंदा,वानोळा,पानोळा,मांडवा, मेंडकी,मुंगशी,कुपटी या परीसरातील शेतकर्‍यांसमोर उभे टाकले आहे.काट्या कुट्या,विंचुकिड्याची पर्वा न करता रात्रभर शेतकरी आपल्या शेतात पहारा देत या कडेचे त्या कडेला फिरुन आपल्या शेतमालाचे जतन करत असतात.अतिशय मेहनतीने संगोपन करुणही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडते.या भयावह संकटापासून शेतकर्‍यांच्या शेतमालाचे संरक्षण होण्यासाठी वनविभागामार्फत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक शेतकर्‍यांना तार कुंपण करण्यासाठी शासनामार्फत भरीव आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.रोह्याबरोबरच अनेक हिंस्र प्राण्यांचाही वावर या परिसरात आढळून येतो त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.वनविभागाचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे आढळून आले.अशातच शासन स्तरावरून कोणत्याही प्रकारची उपाययोजना अथवा मदत केली जात नाही.त्यामुळे शेतकर्‍यामध्ये अस्वस्थाता पसरली असून शेतकरी वैफल्याने ग्रासला आहे.

या परिसरातील लोकप्रतिनीधीही सुस्तावले असून शेतकर्‍यांच्या या गंभिर प्रश्नकडे वेळ देण्यास त्यांच्यामध्ये उदासिनता दिसून येते. आमदार भिमराव केराम हे या मतदार संघाचे नेतृत्व करत असून त्यांना या परिसरातील शेतकर्‍यांच्या समस्याची जाणीव असतानाही ते या प्रश्नवर गप्प का आहेत.त्यांच्या मार्फत ठोस पावले का उचलल्या जात नाही.असे शेतकरी वर्गाकडून विचारणा केली जात आहे. शेतकर्‍याच्या मदतीला कोणी धाऊन येईल का? स्थानिक वनविभाग या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देईल का? तसेच शासन स्तरावर याची दखल घेतल्या जाईल का ? शेतकर्‍यांच्या या प्रश्नावर कायमचा तोडगा निघेल का ? पालक मंत्री यामध्ये लक्ष घालतील का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.या परिसरातील शेतकरी मोठ्या आशेने मदतीची याचना शासनाकडे करत आहेत.या गंभिर प्रश्नाची वेळीच दखल घेऊन ठोस उपाय योजना करुण शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here