यावल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

सुपडू संदानशिव

यावल तालुका प्रतिनिधी

मो: 9561200938

यावल- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन , शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचानामे करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह तालुक्यातील ईतर पदाधिकारी व शेतकरी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक १६ सप्टेंबर रोजी यावल तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तापी नदीला महापुर आल्याने तापी काठावरील भालशिव, पिंप्री, टाकरखेडा ,बोरावल या शिवारातील शेतामधील पिकांचे आतोनात नुकसान झाले असून,महसुल प्रशासनाने तात्काळ या परिसरातील नुकसान ग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करावे व शेतकरी बांधवांना शासना च्या वतीने तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली असुन,निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी तुषार उर्फ मुन्ना पाटील, माजी मसाका संचालक सुभाष आप्पा साळुंके, आंनदा कोळी , कैलास कोळी, विश्वनाथ कोळी,मनिष कोळी ,राजु कोळी, वसंत तायडे , नारायण कोळी ,नथ्थुराजधर कोळी , चिंतामण तायडे ,आनंदा तायडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here