गणपती बाप्पा समोर माणुसकी धर्माचा एकतरी संकल्प करावा…

 सर्वाचा लाडका देव म्हणजेच गणपती बाप्पा होय.एक वर्षापासून बाप्पाच्या येण्याची सर्वाना ओढ लागलेली असते आणि जेव्हा गणपती बाप्पाची जवळ येण्याची तारीख येते तेव्हा आठवड्यापासून घरोघरी, गावागावात, चौकात,चौकात सजावटीला सुरुवात होते. जिकडे, तिकडे आनंद दिसते मनामनात आनंद दिसतो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल, ताशाच्या, टाळ मृदंगाच्या गजरात अनेक वाद्याच्या साह्याने गणपती बाप्पाला आणल्या जाते व बाप्पाची स्थापना केली जाते अनेक प्रकारचे पदार्थ बणवले जातात तसेच अनेक प्रकारचे फळे ठेवली जातात. जास्वंदाचे फुले आणि दुर्वा वाहून पूजा, अर्चना सकाळ, संध्याकाळी करून आरती केली जाते एवढे भक्तीमय वातावरण बघायला मिळत असते.

गणपती बाप्पा समोर भजन, कीर्तनाचे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते हि एकता व आपुलकी, माणुसकी सर्वामध्ये दिसत असते खास करून गणपती बाप्पा लहान मुलांना खूप आवडत असते. त्याचे अनेक नाव आहेत, कोणत्याही धार्मिक कार्यात पहिला पूजेचा मान गणपती बाप्पाला दिल्या जाते कारण तो मंगलमूर्ती आहे या विषयी कथा सर्वांना माहीतच असेल या दहा दिवसाच्या गणेश उत्सवात एवढं काही चांगले बघायला मिळत असते की, कधी गणपती बाप्पा जाऊच नये असेच वाटत राहते. ह्याचे खरे कारण म्हणजेच प्रत्येक माणूस श्रध्दाळू,दयाळू, प्रेमळ दिसते सोबत त्यांच्यात गणपती बाप्पाविषयी जेवढी आपुलकी दिसते तेवढीच आपुलकी, माणुसकी इतरांच्या बाबतीत सुध्दा दिसत असते पण, हे,सर्व दहा दिवस मर्यादित न ठेवता कायम पर्यंत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

        असे जर झाले तर गणपती बाप्पाला सुद्धा खूप आनंद होईल कारण दहा दिवस मोठ्या श्रध्देने, भक्तीने बाप्पाची सेवा, आराधना केली जाते तेवढी पूजा बाप्पा नक्कीच बघत असेल कारण तो ईश्वर आहे समाजाची सेवा, गोर,गरीबांना आधार, रंजल्या, गांजल्यासाठी धावून जाणे व स्वतः मध्ये प्रामाणिकपणा,आपुलकी ठेवून नि:स्वार्थ भावनेने कार्य करणारी व्यक्ती बाप्पाला आवडत असते. म्हणून जेवढा विश्वास व श्रध्दा‌ बाप्पावर ठेवली जाते तेवढाच विश्वास स्वतःवर ठेवायला पाहिजे.सोबत चांगले विचार, ‌सत्याचा स्वीकार,मेहनत ,स्नेह सर्वाचा आदर हे सर्वच गुण जर प्रत्येक माणसात असतील तर बाप्पाला सुद्धा आनंद होईल कारण ईश्वराला हेच तर हवे असते.

माणूस हा माणसासाठीच असतो व जो माणूस, माणुसकी ठेवून आपुलकीच्या नात्याने माणसासाठी पशू, पक्षासाठी, झाडांसाठी जगतो तीच खरी पूजा बाप्पाची असते देव शेवटी भावाचा भुकेला असतो असे आमचे थोर संत सांगून गेले आहेत म्हणून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून माणसासारखे जगले पाहिजे. दहा दिवस बाप्पाच्या नामात तल्लीन होऊन आपण सर्व काही विसरून जातो तसच द्वेष, तिरस्कार, निंदा, चुगली, खोटे बोलणे,हिंसा, चोरी, व्यसन, मारामारी, फसवणूक, दिखावूपणा, ढोंगीपणा,भेदभाव, अंधश्रध्दा ह्या सर्व व्यर्थ गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करावे व माणुसकी धर्म कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी बाप्पा समोर संकल्प करावे जीवन अजून सुंदर होईल आणि पुन्हा त्याच जीवनाला सुंदर बनविण्यासाठी इतरांनाही मानवी जीवनाचे महत्व पटवून द्यावे शेवटी हेही महान कार्य आहेत. 

      हेच कार्य बाप्पाला ही नक्कीच आवडतील कारण तो ईश्वर आहे त्याला सर्व काही कळत असते. बाप्पाचे गुणगाण करावे, गजर करावा पण, एक संकल्प माणुसकी धर्म टिकवून ठेवण्याचा करावे सर्व चांगलेच बघायला मिळेल.

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here