शताब्दी चौकात मंगळवारी भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू …

52

शताब्दी चौकात मंगळवारी भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू झाला

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधी  

मो 9096817953

सचिन दुर्जनलाल भीमटे (३८) असे मृताचे नाव असून तो प्लॉट क्रमांक ७८, श्रीराम नगर, न्यू सुभेदार लेआउट, हुडकेश्वर येथील रहिवासी होता.भीमटे हे सकाळी 12.10 च्या सुमारास खापरी येथून मोटारसायकलने (एमएच-31/बीआर 5868) घरी परतत होते. मानेवाडा रिंगरोडवर सुयोग नगर दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या हुंडई i10 कारने (MH-32/C-7279) दुचाकीला धडक दिली. भीमटे हे दुचाकीवरून फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. भीमटे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता पहाटे एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मृताची पत्नी राणू (३६) हिने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी कार चालक किशोर रामचंद्र बाभ्रे (४१, रा. प्लॉट क्रमांक ५५, सरस्वतीनगर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच घटनेचा पुढील तपास सुरू आहे.