सिंदेवाहीत मीना बाजार जीवावर बेततोय!

148

सिंदेवाहीत मीना बाजार जीवावर बेततोय!

सिंदेवाही वृत्त सेवा
7058203220

सिंदेवाही :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की दरवर्षी सिंदेवाही मध्ये मस्कऱ्या गणपती महोत्सव मोठया थाटात होत असते आणि दरवर्षी मीना बाजार ही येत असते आणि यावर्षी ही मीना बाजार सिंदेवाहीच्या मुख्य रस्त्यावर सुरू झालेला गॅलेक्सी इंटरनॅशनल फन फेअर म्हणजेच मीना बाजार आता स्थानिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. येथील एक झूला मुख्य रस्त्याला लागूनच असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहेआणि म्हणून सिंदेवाही च्या नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने मीना बाजार च्या मालकाला भेटून योग्य ती उपाय योजना कराव्यात अशी मागणी जनते तर्फे होत आहे.

आणि एकीकडे मीना बाजार ला पोलीस प्रशासना कडून अकरा वाजेपर्यंत परवानगी असतानाही हा मीना बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. या बेजबाबदारपणामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी सिंदेवाही शहरात जोर धरत आहे.