Home latest News नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे महाआरोग्य शिबिराचे उदघाटन
नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे महाआरोग्य शिबिराचे उदघाटन
विश्वास गायकवाड
९८२२५८०२३२
बोरघर माणगाव प्रतिनिधी
संपूर्ण देशभरात ”राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता” जन्म दिवसाचे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला सुरुवात झाली आहे या अभियानांतर्गत “स्वास्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे ना भरत गोगावले यांच्या हस्ते महा आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले. सदर शिबिरात शुगर, रक्तदाब, व इत्तर सर्व आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्त नारी, सशक्त परिवार, नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान, माणगाव उपजिल्हा रुग्णालय रायगड येथे महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर तसेच मोफत नेत्र विकार निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर शुभारंभ ना. भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, तहसीलदार दशरथ काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा पोहरे, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पोवार, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ना. गोगावले यांच्या हस्ते विविध योजनांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी ना. गोगावले म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ९९% लोक ही गरीब येत असतात. त्यात आदिवासी बांधवांचा जास्त समावेश असतो. अशा वेळेला उपजिल्हा रुग्णालय हे त्यांच्यासाठी वरदान ठरत. काही उपचारासाठी अलिबाग व मुंबई येथे जाव लागत. उपजिल्हा रुग्णालय उत्कृष्ट सेवा देत आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे सर्वांनी वर्षातून एकदा तरी रक्तदान करा. घरातील महिला स्वस्थ्व व सुदृढ असेल तर पूर्ण परिवार स्वस्थ व सशक्त राहतो. त्यामुळे
महिलांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखरपणे जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्र आता अत्याधुनिक झाले असून वेळेत आजारावर उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो. जगभरात कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात महिलांमध्ये कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी महिलांनी वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी केली पाहिजे. जेणेकरून योग्य वेळेत उपचार करता येतील. उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध आहे. त्याचा रुग्णांनी लाभघ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा यावेळी ना. गोगावले यांनी दिल्या. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ना. गोगावले यांनी केले.
या अभियानांतर्गत सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा रक्तदाब मधुमेह नेत्र दंत रोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुखकर्क रोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसुती पूर्व तपासणी, लसीकरण सेवा रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिक्स सेल आजार व रक्तक्षय तपासणी, विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन, निरोगी जीवनशैली आणि पोषण, स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे, गरोदर आणि स्तनदा मतांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार, मासिक पाळी स्वच्छता व पोषण, टेक होम राशन (Thr) चे वितरण, आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी, माता व बाल सुरक्षा एम सी पी कार्ड प्रधानमंत्री मात्र वंदना योजना नोंदणी वंदना कार्ड सिकलसेल कार्ड मध्ये लाभार्थी नोंदणी, मोफत नेत्र विकार निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर या शिबिरात प्रमुख तपासणी
डोळ्यांचे प्राथमिक विकार तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी, मोतीबिंदू तपासणी इत्यादी आजारांवर तपासणी आणि उपचार शिबिर संपूर्ण देशभर आयोजित करण्यात आले आहेत. शुभारंभ रायगड जिल्ह्यातील माणगाव उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी करण्यात आला.