Home latest News मुख्यमंत्री समृद्ध योजना अंतर्गत विकासाची गंगा पोहोचवणार….सरपंच आदित्य कासरुंग
मुख्यमंत्री समृद्ध योजना अंतर्गत विकासाची गंगा पोहोचवणार….सरपंच आदित्य कासरुंग
म्हसळा: संतोष उध्दरकर.
म्हसळाःस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुशासन आणत कार्यक्षमता वाढविणे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत गावोगावात विकासाची गंगा पोहोचवणे आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे या उद्देशाने १७ सप्टें ते ३१ डिसें या कालावधीत *मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान* राबविण्यात येत असून यासाठी ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढे तर्फे श्रीवर्धन तर्फे विशेष ग्रामसभेचे आयोजन कोंढे तर्फे श्रीवर्धन येथील सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत गाणी कोंढे तर्फे श्रीवर्धन सरपंच आदित्य कासरुंग, उपसरपंच सुभाष उजळ, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम राहटवळ , निखिल कदम, चांदणी कासरुंग, तनिषा आंब्रस्कर, विशाखा उजळ, श्रेया उजळ तलाठी, शिक्षक, वनपाल, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, बचत गट पदाधिकारी, दोन्ही गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी एकजुटीचे सूत्र अमलात आणले तर सर्वोत्तम काम करून दोन्ही गावात विकासाचे नवे शिखर गाठण्याची ही सुवर्णसंधी आहे केवळ बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे तर गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे अभियान मार्गदर्शक ठरणार आहे या अभियानात ग्रामस्थांचे मुंबई मंडळाचे अनमोल सहकार्य यशस्वी होण्यास महत्त्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन सरपंच आदित्य पासून यांनी व्यक्त केले.
लोकाभिमुख प्रशासन, पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वच्छता, सौर ऊर्जा वापर, मनरेगा योजनेचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, आणि लोकसहभाग अशा महत्त्वाच्या क्षेत्रावर ग्रामपंचायतची कसोटी पाहिली जाणार असून श्रमदान संस्कृती निर्माण करणे, बचत गटांचे सक्षमीकरण करणे या उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात येणार आहे विशेष काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना ५ लाखांपासून ते ५ कोटीपर्यंत बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.