*मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्थेच्या वतीने “शिक्षकांची चार दिवसीय कार्यशाळा” संपन्न.*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वयक मा. योगेश मोरे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर व जिल्हा परिषद चंद्रपूर वतीने राजुरा तालुक्यात “SCALE” कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ५८५४ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा कार्यक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचा हा उपक्रम राजुरा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांमध्ये राबवित येत आहे. हा SCALE कार्यक्रम शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे त्यासाठी याची रूपरेषा व कार्यपद्धती समजून येण्याच्या अनुषंगाने दि.११ ते १४ आक्टोबर २०२१ नक्षत्र हाॅल बाम्हणवाडा राजुरा येथे या ठिकाणी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा यातील ८० निवडक शिक्षकांची चारदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे मा. आशुतोष सपकाळ (BDO) गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा,मा.विजय पारचाके गटशिक्षणाधिकारी राजुरा, मा. मेश्राम सर विस्तार अधिकारी (BRC) मा. हेडाऊ सर विस्तार अधिकारी( BRC) श्री.प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस फाउंडेशन चंद्रपूर व सर्व शाळेतील शिक्षक व संसाधन व्यक्ती होते.
सदर चार दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा साहाय्यक अधिकारी संदेश चुनाळकर, गणेश दुधबळे,सतिश खंदारे, मिनाक्षी सयाम, महेश होकारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here