नागपुर आमला इटारशी पॉसेंजर चालु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी काटोल रेल्वे स्टेशन येथे आंदोलन.
स्टेशन मास्तरांच्या माध्यमातुन रेल्वे प्रबंधकाना शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर.
स्टेशन मास्तरानी लवकरच प्यासेंजर चालु होण्याचे दिले संकेत.
✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
काटोल/नागपुर:- देशात कोरोना वायरसच्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून नागपुर आमला इटारशी रेल्वे पॉसेंजर बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. यामध्ये दररोज रोजी रोटिसाठी नागपुरात किव्हा आमला याठिकाणी जाणारे गोरगरीब जनता, शिक्षणाकरिता जात असलेले विद्यार्थी, दवाखान्याच्या कामाकरीता जाणारे नागरीक, छोटा मोठा व्यवसाय करणारे दुकानदार, शासकीय कामासाठी जाणारे लोक, अपंग बांधव, सुरेक्षेच्या द्रुष्टीकोनातून प्रवास करणाऱ्या महिला भगिनी, विद्यार्थिनी शासकीय सेवेत काम करणारे सरकारी कर्मचारी या सर्वांचे फार मोठे नुकसान होत आहे.
पॉसेंजर बंद असल्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडल्यामुळे अनेकांना उपासमार सहन करावा लागत आहे. तसेच एसटीच्या व प्रॉयव्हेट बसेसच्या तिकिटा महाग असल्यामुळे व कमी पैशात वेळेवर व सुरक्षित प्रावासाची हमी असल्यामुळे जास्तीत जास्त लोक पॉसेजरच प्रवास करतात अशा परिस्थितीत ही पॉसेंजर चालु करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी काटोल नरखेड विधानसभेच्या वतीने आज काटोल रेल्वे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व नगर पालिकेचे माजी सभापती दिगांबर डोंगरे, काटोल तालुका अध्यक्ष देवीदासजी घायवट, काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे यांच्या नेतृत्वाखाली नारे निदर्शने करून रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे नागपुर यांना काटोल स्टेशन मास्तर यांच्या माध्यमातुन शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत निवेदन सादर करण्यात आले. यावेळेस लवकरच प्यासेंजर चालु करण्यात येईल असे संकेत रेल्वे प्रबंधकाच्या मार्फत स्टेशन मास्तरनी दिले.
जर का येत्या महिन्याभरात नागपुर आमला इटारशी रेल्वे पॉसेंजर सुरु करण्यात आली नाही तर, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपुर रेल्वे स्थानकावर मोठे आंदोलन करण्यात येईल असे यावेळेस दिगांबर डोंगरे यांनी निवेदनात सांगितले.
निवेदन देतेवेळी देतेवेळी दिगांबर डोंगरे, देविदास घायवट, डॉ. सुधाकर कावळे, सुमेध गोंडाने, डॉ. सुनिल नारनवरे, सौ. सुजाताताई डबरासे, श्रीकांत गौरखेडे मनीष रामटेके.शेखर गोंडाने, सुरेश देशभ्रतार, रामराव पाटील, असलम शैख, रमेश सुरजुसे, दिनेश काचेवार, सुनिल वरघट, बादल वासनिक, संदीप माहुलकर, सुजीत बारमासे, धर्मेंद्र राऊत, नंदकिशोर डबरासे, ओंकार मलवे, बाबाराव गोंडाने, प्रकाश निस्वादे, मोतीराम तागडे, देवेन्द्र थोटे, मोहन विश्वकर्मा, प्रदिप गायकवाड, पितांबर गायकवाड, अशोकराव बागडे, सत्तार शैख, रोशन गजभिये, सिद्धार्थ रक्षित, प्रणय रक्षित, अक्षय बांगर, आदित्य रक्षित, तुकाराम देशभ्रतार, गुलाबराव शेंडे, शंकरराव काळभांडे, मनोज गायकवाड यांच्या मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.