महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे डॉ.लुनेश्वर भालेराव यांचा हृदय सत्कार !… डॉ.भालेराव यांच्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना २४ स्पोर्ट जर्सी किट व व्हॉलीबॉल भेट !…

56
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे डॉ.लुनेश्वर भालेराव यांचा हृदय सत्कार !... डॉ.भालेराव यांच्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना २४ स्पोर्ट जर्सी किट व व्हॉलीबॉल भेट !...

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे डॉ.लुनेश्वर भालेराव यांचा हृदय सत्कार !…

डॉ.भालेराव यांच्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना २४ स्पोर्ट जर्सी किट व व्हॉलीबॉल भेट !…

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे डॉ.लुनेश्वर भालेराव यांचा हृदय सत्कार !... डॉ.भालेराव यांच्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना २४ स्पोर्ट जर्सी किट व व्हॉलीबॉल भेट !...

धरणगांव प्रतिनिधी : एस डी मोरेसर

धरणगाव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल चे माजी विद्यार्थी डॉ. लुनेश्वर भालेराव ( पत्रकार तथा उद्योजक – पुणे – धरणगाव ) यांनी महात्मा फुले हायस्कूलच्या व्हॉलीबॉल व कबड्डी संघासाठी ‘ १२ – १२ स्पोर्ट जर्सी व व्हॉलीबॉल शाळेस देणगी स्वरुपात उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा आज हृदय सत्कार करण्यात आला .
प्रथमतः क्रिडा शिक्षक श्री एच डी माळी यांनी डॉ. लुनेश्वर भालेराव यांचा परिचय करून दिला . त्यानंतर शाळेचे पर्यवेक्षक श्री एम बी मोरे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन डॉ. लुनेश्वर भालेराव यांचा सत्कार करण्यात आला .
या नंतर शाळेचे उपशिक्षक श्री व्ही.टी. माळी यांनी डॉ. लुनेश्वर भालेराव यांच्या कार्यबद्दल माहिती दिली . व शाळेस यापुढेही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
सत्काराला उत्तर देताना डॉ. लुनेश्वर भालेराव यांनी गुरुजनांबद्दल आदरभाव व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आपल्या कार्यात गुरुजनांचे ज्ञान व मार्गदर्शन खूप मोलाचे ठरते . आपणही शाळेविषयी कृतज्ञता बाळगावी सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रिडाशिक्षक एच डी माळी यांनी केले . कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले .