अवैध देशी- विदेशी दारूवर धाड
(स्थागुशा चे घडक कार्यवाही)
✒️बबलू भालेराव ✒️तालुका प्रतिनिधी ऊमरखेड मो.9637107518
उमरखेड (दि.20 ऑक्टोंबर) रोजी स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद चे अधिकारी व अंमलदार यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की मौजे गौळ ता. पुसद येथे अवैधपणे देशी- विदेशी दारू ची विक्री होत आहे.
अशी माहिती मिळण्याने मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बन्सोड (भा.पो.से) सा, मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप सा. व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने सा.यांचे मार्गदर्शखाली सपोनि गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे,सपोनि दिपक ढोमणे पोहवा पंकज पातुरकर ,पोहवा तेजाब रंणखांब, सुनिल पंडागळे, पोना कुणाल मुंडोकार,चालक पोउपनि रेवन जागृत नापोका नाना मस्के पोस्टे पोफाळी यांनी ग्राम गौळ खुर्द येथील अवैध दारू विक्रेता नामेे राजू पांडुरंग जाधव वय 25 वर्ष रा. गौळ ता पुसद यांच्यावर छापा कार्यवाही केली असता त्यांच्या ताब्यातून 77 शीशा 90 एम एल च्या देशी दारू बॉबी संत्रा, प्रत्येकी किंमत 35 रुपये प्रमाणे 2695/- रुपयाचा मुद्देमाल व दुसरा अवैध दारू विक्रेता अमोल प्रल्हाद पवार वय 26 वर्षे रा. गौळ याचे ताब्यातून देशी दारू चा 4970/- व विदेशी दारू 4050/- चा मुद्देमाल असा दोन्ही इसमांकडून एकूण 11,715/-रुपये चा मुद्देमाल जप्त करून पोस्टे पोफाळी येथे स्थागुशा कॅम्प पुसद चे अंमलदार मार्फत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.