औरंगाबाद: बसपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.

53

औरंगाबाद: बसपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.

बसपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.
बसपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.

✒️औरंगाबाद प्रतिनिधी✒️
औरंगाबाद:- वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश सोहळा शासकीय विश्राम गृह सिल्लोड येथे संपन्न झाला. बसपाचे जिल्हा प्रभारी संदीप सुरडकर आणि सिल्लोड विधानसभा अध्यक्ष गौतम भिवसाने यांनी पदाधिकारी यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहिर प्रवेश केला. याच बरोबर महेमूद पठाण, संदीप जगताप, भराडीचे माजी तंठामुक्त अध्यक्ष शमीम भाई शेख प्रवेश केला.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष प्रभाकर मामा बकले यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शालिक बापू शेळके, तालुका महासचिव के के जगताप, माजी नगरध्यक्ष बनेखा पठाण, तालुका उपाध्यक्ष मुस्ताक पठाण, तालुका प्रसिद्धी प्रमुख हर्षद बोर्डे, विष्णू दांडगे, नाना जाधव विनोद शेळके, निलेश जगताप, अखलाक भाई नासेर भाई, विकास साळवे, विजय साळवे. स्वप्नील शेजूळ यावेळी सिल्लोड तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.