हिंगणघाट तालुक्यात लोक सहभागातून पांधण रस्ते व शेत रस्ते उभारणीचा वडणेर येथुन श्रीगणेश.
● अनेक शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न लागणार मार्गी.
● महसूल प्रशासनाची अभिनव योजना, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे केलें आव्हान.

✒️ मुकेश चौधरी ✒️
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
📲 7507130263📲
हिंगणघाट:- तालुक्यात लोकसहभागातून पांधण रस्ते व शेत रस्ते उभारणीला सुरुवात झाली असून, अनेक शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला वहिवाटीचा प्रश्न यातून मार्गी लागणार आहे. हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे शिरसगाव रोड ते भूते यांच्या शेतापर्यंत ७१० मीटर पांधन रस्त्याचे भूमिपूजन आज उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसीलदार सतीश मासाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराजस्व अभियान सर्वत्र राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. याच अभियानाअंतर्गत हिंगणघाट उपविभागातील पांदण रस्ते मोकळे करुण त्याचे माती करण व खडीकरण करण्याची मोहीम प्रत्येक गाव शिवारात राबविण्यात येणार आहे. आज या मोहिमेचा शुभारंभ वडनेर शिरसगाव पांधन रस्ता लोकसहभागातून मोकळा करून माती करण व खडीकरण करण्याचे भूमिपूजन करीत झाला. तहसीलदार सतीश मासाळ यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांना आपापल्या मंडळात शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी काढण्यासाठी म्हणून लोक सहभागातून पांधन रस्ते निर्मितीची माहिती देत या उपक्रमाचा पाया रचला.
मौक्यावर अतिक्रमणाचा निपटारा करून मोजमाप करीत रस्ता मोकळा करून देण्याचे काम तहसील विभाग करत असल्याने, या मोहिमेला गती आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून तहसील कार्यालयात संपर्क साधत लोकसहभागातून पांधन रस्ते निर्माण करून घ्यावे, असे आव्हान तहसीलदार सतीश मासाळ यांनी केले आहे. यावेळी नायब तहसीलदार समशेर पठाण, मंडळ अधिकारी श्याम चंदनखेडे, तलाठी सुटे तसेच लंकेश नगराळे, मधुकर महाजन, दिनेश महाजन, पंढरी महाजन, शंकर लेंगरे, अरुण महाजन, राहुल ठाकरे, पवन आपटे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी महाराजस्व अभियानात प्रलंबित फेरफार निकाली काढणे आकारफोड पत्रक दुरुस्ती आणि इतर महसूल विषयक उपक्रमाची माहिती दिली