अकोला जिल्हात ऑनलाइन लावला एकाला एक लाख रुपयांचा चुना, गुन्हा दाखल.

✒ सिद्धार्थ पाटील ✒
बोरगाव मंजू प्रतिनिधी
📲 7741837831 📲
अकोला:- जिल्हातील अन्वी मिर्झापूर येथील एका इसमाला आँनलाईन नगदी एक लाख रुपयांचा चुना दिला, व त्यांच्या बॅंक खात्यात जमा एफ डी वर पाच लाख रुपयांचे कर्ज काढून अज्ञात भामट्यांने फसवणूक केल्या प्रकरणी सदर घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला,
प्राप्त माहितीनुसार अन्वी मिर्झापूर येथील शे.मुनिर शे गुलामनबी पटेल सेवानिवृत्त शिक्षक यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा बोरगाव मंजू बचत खाते असुन दिनांक ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दरम्यान पटेल यांच्या मोबाईल वर मॅसेज आला की तुमचे सिम कार्ड बंद होईल त्या करीता केवाय सी करण्यासाठी मेसेज आला होता,त्या नंतर, अज्ञात भामट्याने ९९०७९४४३९३ या नंबरवरुन पटेल यांना फोन केला,त्याने सिम कार्ड ब्लॉक होईल तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे असे सांगितले त्यामुळे मला वयोमानानुसार सुचले नाही त्याने मला जसे सांगितले मी त्यानुसार मी करत गेलो त्याने मला प्ले स्टोर मधून केवायसी टीम व्हिवर ॲप्स डाउनलोड करायला सांगितला व त्याची आयडी सांगितली व आता फक्त दहा रुपयाचे रिचार्ज महा बँक ॲप्स डाऊनलोड करून करा तुमचे बंद पडणार नाही असे सांगितले त्याकरता त्यांनी मला महाबँक ॲप्स डाऊनलोड करायला सांगितले त्यानुसार मी महा बँक ॲप्स घेऊन मी माझ्या जवळील एटीएम वापरून सिम कार्ड चा मागील नंबर वापरला व त्याचा पिन सुद्धा वापरला आणि दहा रुपयाचा रिचार्ज मारला तेव्हा माझे असे लक्षात आले की माझा मोबाईल समोरचा व्यक्ती ऑपरेट करत आहे माझ्या लक्षात आले, तेव्हा पर्यंत दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता माझ्या खात्यातून ४९८७ रुपये काढले गेले त्यामुळे मी माझे मोबाईल वरून दोन्ही ॲप्स डिलीट केले आणि दुसऱ्या दिवशी बँक मध्ये गेलो एटीएम ब्लॉक करण्यासाठी अर्ज दिला आणि दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी पोस्टमन यांनी आमच्याकडे पर्सनल कंरट अकाउंट चेक बुक माझ्या घरी आणून दिले तेव्हा आम्ही परत बँकेमध्ये जाऊन संबंधित बाबी विषयी शाखा अधिकारी यांच्याशी विचारणा केली व खात्याचे सर्व डिटेल्स मागितले असता एफ डी वर पाच लाख रुपये कर्ज काढण्यात आले आहे वर नमूद तीन अकाउंट आहेत त्यांचेच एक पुस्तक आहे असे सांगितले त्यावर त्यांना मी कोणत्याही प्रकारचे लोन काढले नाही असे सांगितले असता त्यांनी आम्हाला सांगितले की त्यावर त्यांनी लोन काढलेल्या पाच लाखा मधून १,००,८८५ काढण्यात आले असे सांगितले कोणीतरी अज्ञात भामट्याने माझी सिम कार्ड च्या केवायसी च्या नावाखाली फसगत करून माझ्या बँक खात्यातून ४९८७ रुपये काढले व त्यानंतर माझ्या बँकेतील एफ डी वर पाच लाखाच्या ऑनलाईन लोन घेऊन त्या मधुन पुन्हा १,००,८८५ रुपये काढून एकुण १०५८७२ रुपये माझ्या खात्यातून ऑनलाइन काढून अज्ञात भामट्याने माझी फसवणूक केली अशी फिर्याद सदर सेवा निवृत्त शिक्षकाने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली वरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल, शरद बुंदे, शेख फईम भाई हे करत आहेत.