केंद्रातील मोदी सरकारची मेगा विक्री सुरु: लवकरच विकल्या जाणार देशातील 6 मोठ्या कंपन्या.

प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348📲

नवी दिल्ली:- शेतकरी आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारची मोठी हाराकिरी झाली. त्यामूळे सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे परत घेण्याची परस्थिती सरकार वर आली. आता केंद्रातील मोदी सरकार देशातील 6 मोठ्या कंपन्या विकण्याच्या तयारी तर आहे असे समोर आले आहे. सध्या सुरू असलेल्या या आर्थिक वर्षात या 6 सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकारची योजना आहे.

देशातील बीपीसीएल (BPCL) व्यतिरिक्त बीईएमएल (BEML), शिपिंग कॉर्प (Shipping Corp), पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात या कंपन्या पुढील काही दिवसात केंद्र सरकार खाजगी व्यापा-याला विकणार असल्याचे समोर आल्याने लोकाच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहे.

बीपीसीएलच्या या देशातील मोठ्या कंपनीचे खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांची आर्थिक बोली (फायनान्शियल बिडिंग) डिसेंबर-जानेवारीमध्ये केली जाऊ शकते. त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रियाही या आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी नुकतीच ही माहिती दिली. यासोबतच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या बहुप्रतिक्षित आयपीओ (IPO) ची प्रतीक्षाही संपणार आहे. कंपनीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च दरम्यान बाजारात दाखल होऊ शकतो. सरकार एलआयसीमधील 10 टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकणार आहे. यातून त्यांना 10 लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here