स्कुल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट व मेघे ग्रुपच्या वतीने करण्यात आला पत्रकारांचा सत्कार.

✒ मुकेश चौधरी ✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
📲 7507130263 📲
हिंगणघाट:- शहरातील स्कुल ऑफ स्कॉलर्स आणि मेघे ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या औचित्य साधून शहरातील पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला होता. या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रमिंदर कौर मोदी तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक, हिंगणघाट समुद्रपुर पत्रकार संघ अध्यक्ष सतीश वखरे, मेघे ग्रुप नागपुरचे मार्केटिंग प्रमुख रितेश नायर तसेच जेष्ठ पत्रकार विजय राठी, मुकेश चौधरी, भास्करराव कलोडे, संदीप रेवतकर, संजय अग्रवाल, प्रदीप आर्या, राजेन्द्र राठी, राजेश अमरचंद कोचर, प्रदीप नागपुरकर, केवलदास ढाले, रवि येनोरकर, दशरथ ढोकपांडे, नरेंद्र हाडके, मलक नईम, केशव तितरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शहरातील पत्रकारांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य कौर यांनी पत्रकारितेचे महत्त्व व हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश व पत्रकारिता म्हणजे काय हे समजावून सांगितले. हिंगणघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष हांजी मोहम्मद रफिक यांनी बदलत्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. संतोषी बैस शिक्षक समन्वयक, प्रदीप जोशी प्रशासकीय अधिकारी स्कूल ऑफ स्कॉलर्स मेघे ग्रुप यावेळी उपस्थित होते. शाळकरी मुलीनेही पत्रकारांबद्दल आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाळेच्या शिक्षिका दिव्या गुप्ता व अमिना शेख यांनी केले तर आभार शालेय प्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी मानले.
याप्रसंगी शाळेतील कला शिक्षक निलेश डोंगरे, संगीत शिक्षक अतुल तिवारी, खेल व क्रिडा शिक्षक सत्येंद्र झोटिंग, संगणक शिक्षक अमित थूल, मराठी शिक्षिका सुनंदा वैद्य व सर्व शालेय शिक्षिका, शिक्षक व कर्मचारी यांची उपस्तिथि होती.