गरीब गरजूंना ब्लांकेट व कपड्यांचे वाटप, युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे उपक्रम.

✒सिद्धार्थ पाटील✒
बोरगाव मंजू प्रतिनिधी
📲 77418 37831📲
अकोला/बोरगाव मंजू:- अलीकडे बरीच मंडळी आपला वाढदिवस भलामोठा खर्च करून साजरा करतात परंतु बोरगाव मंजू येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद अशोक पाटील तायडे (इंजिनीयर) यांनी मात्र आपला वाढदिवस 13 नोव्हेंबरला कोणताही गाजावाजा न करता गरजू गोरगरीब जनतेला ब्लॅंकेट व कपड्यांचे वाटप करून साजरा केला.

अशोक पाटील तायडे यांच्या या उपक्रमाची बोरगाव मंजूत सर्वत्र चर्चा होऊन या युवा ग्रामपंचायत सदस्याने आपल्या वाढदिवसा निमित्त हा उपक्रम राबवून युवकांमध्ये एक प्रकारचा आदर्श निर्माण केल्याचे बोलल्या जात आहे या कार्यक्रमाला संस्थेचे आशिष तायडे, धीरज भोंबळे, सागर धुरीया, संकेत लोखंडे, ऋषिकेश तायडे तसेच धीरज मुंजाळ, आकाश विल्हेकर, जयंत वानखडे मयूर निवाने, दर्शन तायडे, वैभव तायडे, पियुष वानखडे ऋषिकेश पळसकर, कुणाल पारसे आदी युवा कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.