राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य         बोलण्याचा ठेकाच घेतला की                   काय!                     

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

नागपूर: भगतसिंग कोशियारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल की मराठी माणसाचे वैरी!कारण अधुनमधून वारंवार मराठी माणसांवर व कर्तुत्वावर  शाब्दिक वार प्रतीवार करीत असतात.त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जाते. काही महिन्या अगोदर                    राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी गुजराती-राजस्थानी विरूद्ध मराठी असा वाद निर्माण करून कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता औरंगाबाद येथे शरद पवार आणि नितीनजी गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलतांना नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली.

ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत?तर बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही.इथेच महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील.”शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी करून  महाराष्ट्रात नवीन वाद निर्माण केला.यावरून स्पष्ट होते की भगतसिंग कोश्यारी हे वाद निर्माण करणारेच राज्यपाल आहेत.कारण त्यांच्या नसानसात वाद निर्माण करण्याची प्रवृत्ती दिसून येते.शरदजी पवार किंवा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे काम अत्यंत चांगले आहेत आणि असावेत यात दुमत नाही.आज गडकरींची ओळख संपूर्ण जगात वेगळी आहे आणि ही ओळख त्यांच्या कार्य करण्याच्या शैलीवरून मिळाली आहे.त्यामुळे आज भारतासह जगात नितीनजी गडकरी यांची ओळख अनभिज्ञ आहेच यात दुमत नाही.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची इतर कोणाशीही तुलना करणे योग्य नाही.

कारण आताचा काळ आणि पुर्वीचा काळ यात जमीन-आसमानचा फरक आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांशी युद्ध केले, गडकिल्ले जिंकले त्यांच्यापुण्याईने आपण मोकळा श्वास घेत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.आणि याच मराठी भुमित छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना राजकीय पुढाऱ्यांशी करता ही बाब राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना व यांच्या पदाला शोभा देत नाही.नितीनजी गडकरी राष्ट्रीय नेता आहेत, विकासपुरुष आहेत, त्यांनी विकासाचा महामेरू संपूर्ण भारतात उभा केला त्याचप्रमाणे जगात त्यांची आगळीवेगळी ओळख आहे.मी तर म्हणेल की गडकरी सारखा विकासाला चालना देणारा नेता अजुनपर्यंत निर्माण झालेला नाही.परंतु हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांशी करणे राज्यपालांच्या पदाला शोभतच नाही.यामुळे त्यांचे डोके ठीकाण्यावर नसल्याचे दिसून येते.

त्यामुळे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींनी ताबडतोब राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा.कारण महाराष्ट्राला भगतसिंग कोश्यारी सारख्या वादग्रस्त राज्यपालांची गरज नाही.कारण राज्यपाल कमी परंतु वादग्रस्त वक्तव्य देण्यात पटाईत असल्याचे दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आदर्श होते आणि आहे ही बाब कोश्यारी यांनी लक्षात ठेवली पाहिजे.कोश्यारीजी आपण संविधानीक पदावर आहात त्यामुळे उचल्ली जीभ आणि लावली टाळ्याला हा धंदा बंद करा आणि महाराष्ट्रातुन नमस्कार करा.

महाराष्ट्राचे व भारताचे जुन्या काळातील आदर्श आणि नव्या युगातील आदर्श आजही छत्रपती शिवाजी महाराजच आहे आणि रहातील हे कोश्यारींनी लक्षात ठेवले पाहिजेत.त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार नाही. कारण कोश्यारी  यांनी पुर्वी राज्या-राज्याच्या लोकांमध्ये वैरत्व निर्माण करण्याचे काम केले आहे.यामुळे मराठी माणसाला मोठी ठेस पोहचली आहे.कोश्यारी यांनी मागे मराठी विरूद्ध गुजराती -राजस्थानी असा घनाघाती वार करून नवीन वाद निर्माण केला होता व समाजामध्ये नवीन आग लावल्याचा प्रयत्न केला होता आणि आणि जुना आदर्श व नवीन आदर्शाचा वाद निर्माण करून महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळन्याचे काम राज्यपाल करीत आहे.

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य निंदनीय असून त्यांच्यावर माननीय राष्ट्रपती महोदयांनी योग्य ती कारवाई करायला हवी.कारण राज्यपालांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत हे सर्वांनाच ग्यात आहे.आता महाराष्ट्राला खरोखरच मराठी राज्यपालांची गरज आहे.राज्यपाल महोदय आपणाला महाराष्ट्राचा इतिहास माहीती नसेल तर महाराष्ट्रातील लहान-मोठ्या मुलांना विचारा ते तुम्हाला ज्ञान देतील.परंतु मराठी माणसाच्या विरूद्ध अवाजवी वक्तव्य करून आपसात वाद निर्माण करू नका.आज तुम्ही ज्या राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसून आहात ती महाराष्ट्राची अस्मिता आहे इतर राज्यांची नाही.त्यामुळे ज्या राज्याचे आपण राज्यपाल आहात त्या राज्याचा मानसन्मान जपायला हवा. राज्यपाल हे पद प्रतीष्ठेच व सन्मानच पद आहे.परंतु आपल्या विवादास्पद वक्तव्यामुळे दिवसेंदिवस या पदाला आपण मलीन करण्याचे काम करीत आहात ही बाब आज महाराष्ट्रातील जनतेच्या पुर्णपणे लक्षात आली आहे.आपली जीभ वारंवार घसरते याचाच अर्थ आपण वारंवार राज्यपाल पदाचा अपमान करीत असतात.आपण राज्यपाल पदाला कलंकित करून बदनाम करण्याचे काम केले आहे.त्यामुळे  राज्यपाल महोदय आपणाला पदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार नाही असे मला वाटते.                                                           

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here