राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करनार
✍ संतोष मडावी✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
86986 39446
चंद्रपूर : – राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रीय महिला महासंघ ,राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा शाखा तर्फे रविवार दिनांक 27 नोव्हेंबर 2022 ला दादासाहेब कन्नमवार सभागृह , चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागपूर रोड चंद्रपूर येथे दुपारी 1 वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अशोक जीवतोडे, उद्घाटक आमदार किशोर जोरगेवार राहणार आहे, वक्ते म्हणून राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते “भारतीय संविधानतील हक्क व अधिकार व लोकशाहीतील पुढील आव्हाने” या विषयावर रुषभ राऊत यांचे मार्गदर्शन करणार आहेत, तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, मार्गदर्शक बबनराव फंड, विमाशीचे सरकार्यवाहक सुधाकर अडबाले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादीचे युवक महाराष्ट्र राज्याचे कर्याध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाधक्ष्य संदीप गिर्हे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नितीन मत्ते, आम आदमी पार्टीचे जिल्हाधक्ष्य सुनील मुसळे , नवनिर्माण सेनेचे नगर प्रमुख सचिन भोयर , राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शाम लेडे, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, डॉ वासुदेराव गडेगोने, डॉ संजय घाटे उपस्थिती राहणार आहे.
या दरम्यान समाजातील मान्यवरांचा संविधान वाटप करून सत्कार करण्यात येणार आहे तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बबनराव वानखेडे, प्रा नितीन कुकडे, विजय मालेकरं, रवींद्र टोंगे, ज्योसना लालसरे, देवराव दिवसे , प्रदीप पावडे, रामदास कामडी,अशोक मोरे,गणेश आवारी,कवडू लोहकरे, तुळशीदास भुरसे, कवींद्र रोहनकर यांनी केले आहे