कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

54
कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 20 नोव्हेंबर
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी व कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शहरी, ग्रामीण व एनयुएसएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएसएम कंत्राटी कर्मचार्‍यांना वयाची अट शिथिल करून नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, ज्या तांत्रिक व अतांत्रिक पदांचे सेवा प्रवेश नियम हे तयार आहेत. त्या पदांचे प्रथम टप्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाच्या आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदांवर सेवा समायोजन करावे, समायोजन होईपर्यत समान काम व समान वेतन धोरण लागू करावे, एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एचआर पॉलिसी लागू करावी, एमएचएम अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मोर्चात संघटनेचे मुख्य समन्वयक रविंद्र उमाठे, अमिता नागदेवते, डॉ. शीला दुधे, डॉ. अक्षय बुरलावार, डॉ. तुषार अगडे, डॉ. विनोद फुलझेले, प्रकाश रेड्डी, अ‍ॅड्. राम इंगळे, जितू बावनकर, वनिता मेश्राम, आराधना झा, ललिता मुत्यालवार, जया मेंडळकर, शालिनी दुुर्गे, रजनी धापटे, सविता पोपटे आदींसह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.