पंचायत समिती ते न्यु ईंग्लिश स्कूल पर्यंत रस्त्याला सुरक्षेच्या दृष्टीने डिवायडर व स्कूल निर्देश फलक लावण्यात यावेत..पालकांची मागणी

नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता.प्रतिनिधी
8983248048

माणगांव :-म्हसळा शहरातील पंचायत समिती ते न्यु ईंग्लिश स्कूल पर्यंतच्या ३०० ते ४०० मी.लांबीचा शहरातील अंतर्गत रस्ता ५०५४(०३) रा.म. अर्थसंकल्पीय कामातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०२२ मध्ये पुर्ण करण्यात आला होता,पण याच रस्त्याला लागून शाळा,काॅलेज,केजी,आय.डि.एल स्कूल, पंचायत समिती, वाचनालय,आय,सि.डि.एस.कार्यालय, सरकारी रुग्णालय असे विविध शासकीय , निमशासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात येणे जाणे असल्याने बांधकाम विभागाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचे उपाययोजना करण्यात आलेली नाहीत, या रस्त्यावर स्कूल निर्देश फलक व डिवायडर नसल्याने भविष्यात अपघात होऊ शकतात, अनेक वेळा खाजगी वाहने,टु व्हिलर अति वेगाने जाताना दिसतात तरी संबंधित विभागाने तातडीने या परिसरातील रस्त्यांवर डिवायडर व स्कूल निर्देश फलक लावण्यात यावेत अशी पालकांनी मागणी लावून धरली आहे.एखादा अपघात झाला तर संबंधित विभाग जबाबदार असेल यामुळे या रस्त्यावर लवकरात लवकर डिवायडर व स्कूल निर्देश फलक लावण्यात यावेत असे मी संबंधित विभागाच्या अधिकाऱी यांना सांगणार आहे असे माजी सभापती रवींद्र लाड यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.तसेच काम सुरू असताना पुढे शाळा आहे याचे भान ठेवून सुरक्षितता जपली गेली पाहिजे होती असे ही लाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here