अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनाला यश : अ. भा. सरपंच परिषदेची एकजुट आली कामी.

अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनाला यश : अ. भा. सरपंच परिषदेची एकजुट आली कामी.

अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनाला यश : अ. भा. सरपंच परिषदेची एकजुट आली कामी.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

राजुरा :– कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या विरोधात दत्तक ग्रामपंचायत चे धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू केले. या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिला होता एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मौदानात उतरून गावागावात कंपनी विरोधात निषेध आंदोलन सुरू केले होते. अखेर वाढता दबाव आणि सरपंचांची एकजुट लक्षात घेऊन तसेच आंदोलनकर्त्यांची आक्रमकता पाहून कंपनी प्रशासन नरमले आणि आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीने सरपंच आणि ग्रामस्थांच्या भावना, आंदोलनाची व्यापकता, आक्रमकता आणि एकजुट लक्षात घेऊन अखेर नरमाईची भुमिका घेतली आणि आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या हे स्वागतार्ह आहे. मात्र यापुढे पून्हा अन्यायकारक धोरण सुरू केल्यास अखिल भारतीय सरपंच परिषद हे खपवून घेणार नाही. आता कंपनी प्रशासनाच्या धोरणांकडे सर्व दत्तक ग्रामपंचायतीने अधिक लक्ष ठेवून आपल्या परिसरातील विविध समस्यांचे निराकरण करून घ्यावे आणि अधिक संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here