मुनगंटीवार यांनी मानले मतदारांचे आभार
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 20 नोव्हेंबर
मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याबद्दल जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी हिरीरीने सहभाग घेवून लोकशाहीची मुल्ये अधिक सक्षम केली आहेत. जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाचेदेखील त्यांनी आभार व्यक्त केले आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासुन तर मतदानापर्यंत जिल्हयात वृत्तांकनाची प्रक्रिया समर्थपणे सांभाळणार्या ‘प्रिंट’ व ‘इलेक्ट्रॉनिक मिडीया’चे देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. निकोप राजकारणाची चंद्रपूर जिल्हयाची परंपरा सर्वांनीच जपली त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव चंद्रपूर जिल्ह्यात उत्तमरित्या संपन्न होवू शकला. या उत्सवातला प्रमुख घटक म्हणजे मतदार लोकशाहीने आपल्याला दिलेला मौलिक अधिकार बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार्या प्रत्येकाचे विशेष आभार मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. या निवडणूकीत मतदारबांधव विकासाच्या बाजुने कौल देतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.