Home E-Paper माजी नगरसेवक हरेश केणी यांची पीएमसी अधिकाऱ्यांसोबत बैठक
परिसरातील प्राणी कल्याण आणि स्वच्छता सुविधांशी संबंधित तातडीच्या गरजांवर केली महत्त्वपूर्ण चर्चा
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल: माजी नगरसेवक हरेश केणी यांच्या समवेत इशिका सुधीजा, कैलाश घरत आणि जसपाल बंगा या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत खारघर परिसरातील प्राणी कल्याण आणि स्वच्छता सुविधांशी संबंधित तातडीच्या गरजांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली.
➡️पीएमसी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांची भेट
प्रतिनिधीमंडळाने कुत्र्यांसाठी निवारा, खाद्य स्थळे आणि पशु रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला. आयुक्तांनी 500 कुत्र्यांना सामावून घेणाऱ्या निवाऱ्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच एका आठवड्यात कुत्र्यांना खाण्यासाठीची जागा दुरुस्त करण्याचेही ते म्हणाले. पुढील काही महिन्यांत पशु रुग्णालय स्थापनेसाठी योग्य जागा निश्चित करण्याविषयीही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डॉ. मधुलिका आणि डॉ. गिते यांच्यासोबत समन्वय साधण्याचे निर्देश दिले.
➡️अतिरिक्त आयुक्त श्री. गणेश शेट्टे यांच्याशी पाठपुरावा
पशु कल्याणाशी संबंधित प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांची भेट घेण्यात आली. त्यांनी या मागण्यांच्या समाधानासाठी त्वरित कारवाई करण्याची वचनबद्धता पुनरुच्चारित केली.
➡️ सेक्टर 34/35 मध्ये ई-टॉयलेट्सच्या स्थापनेवर चर्चा
सदर सेक्टरमध्ये ई-टॉयलेट्सची आवश्यकता मांडल्यावर उपयुक्त वैभव विधाते यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील दहा दिवसांत जागा निश्चित करून या सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
या सर्व चर्चांमध्ये पीएमसी अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल प्रतिनिधीमंडळाने समाधान व्यक्त केले असून, दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.