श्रीवर्धन येथे सकल मराठा परिवारतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

86

“आपल्या रक्ताच्या एका थेंबातून कुणाचं आयुष्य फुलू शकतं”  या घोषवाक्याने  उपक्रमातून देण्यात आला मानवतेचा संदेश

निलेश भुवड

श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी

मो. 8149679123

श्रीवर्धन : सकल मराठा परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले. या उपक्रमात एकूण ३० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सकल मराठा परिवार रायगड समन्वयक सौ. रूपाताई सुखदरे यांनी स.म.प. श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी श्री शैलेंद्र ठाकूर, श्री संतोष यवतकर, सौं. उज्ज्वला यवतकर श्री राजेश चव्हाण, डॉ. निलेश चव्हाण, श्री.राजू गोरुले, श्री अक्षय पवार, कु रंजिता चव्हाण, सौ ऐश्वर्या कोसबे, श्री.संतोष सापते इत्यादी च्या सहकार्याने, तसेच शब्दाचा हाकेला धावून येणारे श्री. प्रीतम श्रीवर्धनकर, श्री काशिनाथ गुरव व श्री आशिष कदम यांचे बहुमोल योगदानातून यशस्वीपणे पार पडला.  

कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सर्व सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले.

या प्रसंगी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबागचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच स. म. प. चे सदस्य उपस्थित होते. 

‘आपल्या रक्ताच्या एका थेंबातून कुणाचं आयुष्य फुलू शकतं’ या घोषवाक्याने प्रेरित या सामाजिक उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात आला. सर्व जाती धर्मातील बंधू-भगिनींनी सहभाग घेऊन शिबिराचे यश अधिक गगनभरारी केले.

सकल मराठा परिवाराकडून सर्व रक्तदात्यांचे तसेच बहुमोल योगदान दिलेल्या प्रत्येक बांधवाचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.