नालासोपारा येथे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान काल सांयकाळच्या सुमारास वसई आणि नालासोपारा स्थानकादरम्यान तीन मृतदेह आढळले.

नालासोपारा:-  नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या आत्महत्येच्या प्रयत्नात 10 वर्षाच्या मुलीचा जीव वाचला आहे. सकाळी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जीव वाचलेल्या १० वर्षांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आई, भाऊ आणि बहीण यांचा मृत्यू झाला.

नालासोपारा-वसई रेल्वे स्थानकादरम्यान वसई दिशेने जाणाऱ्या मालगाडीखाली आजीसह तीन मुलांनी झेप घेतली. एकाच कुटुंबातील आई, मुलगा, मुलगी आणि 10 वर्षांच्या नातीसह आर्थिक चणचणीला कंटाळून आत्महत्या केली. याबाबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर मृतांचे मृतदेह हमालांच्या मदतीने स्ट्रेचरवरून स्थानकात आणण्यात आले.

सर्व विरारचे रहिवासी असून ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा वसई नालासोपारा स्थानकादरम्यान सर्वांनी मालगाडीच्या खाली स्वतःला झोकून दिले. वरकरणी जरी हा अपघात असला तरी या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण या बाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

या अपघातात सुदैवाने 10 वर्षीय मुलीचा जीव बचावला आहे, ती बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. वसई रेल्वे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here