शेतक-यांनी पीकवलेल्या कापसावर जाम येथील सुदर्शन जिनिंगने घातला डाका.

माघिल अनेक वर्षा पासुन सुरु आहे शेतक-यांची लूट. श्री सुदर्शन जिनिंग वर काय करवाई होते यांकडे लागल आहे शेतक-यांच लक्ष.

मुकेश चौधरी प्रतीनिती
वर्धा:- जिल्हातील समुद्रपुर तालूक्यातील जाम येथील श्री सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज ही माघील अनेक वर्षा पासुन वजन काटात दोष निर्माण करुन अनेक शेतक-यांला लूटल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतक-यांच्या तक्रारीवरुन शेतक-यांनी घाम गाळून पीकवलेल्या कापसावर डकैटी करणा-या श्री सुदर्शन कॉटन जिनिंगला सील ठोकण्यात आले.

प्राप्त माहिती नुसार समुद्रपुर तालूक्यातील रेणकापुर येथील शेतकरी सचिन हीरामण शेंडे हे 16 डिसेंबर ला आपल्या शेतातील पीकलेला कापूस गाडी मध्ये भरून श्री सुदर्शन कॉटन जिनिंगमध्ये विकण्याकरिता आणली. गाडी व कापसाचे वजन करण्याकरीता गाडी वजन काट्यावर नेण्यात आली. कापूस आणी गाडी असलेल्या कापसाचे वजन हे 36 क्विंटल 25 कीलो भरले. पण श्री सुदर्शन जिनिंगचा मालक कापसाला देत असलेला भाव शेतक-यांला नाही पटला त्यामूळे त्यांने श्री सुदर्शन जिनिंगचा कापूस न विकता तो जवळचा श्रीवास कॉटन जिनिंगला आपली कापसाने भरलेली गाडी घेऊन गेले. तिथे कापूस भरलेली गाडीचे वजन केले असता 36 क्विंटल 85 कीलो गाडीचे वजन भरले. श्री सुदर्शन जिनिंग पेक्षा श्रीवास जिनिंगला वजन 60 किलो जास्त भरले. त्यामुळे श्री सुदर्शन जिनिंगच्या वजन काट्यामध्ये फसवेगिरी असल्याचे समोर आले.

शेतक-यांच्या घाम गाळून पीकवलेल्या कापसावर डाका टाकणा-या श्री सुदर्शन जिनिंग इतर शेतक-यांची लूट करु नये म्हणून सचिन शेंडे यांनी पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे तक्रार केली. शेंडे यांचा तक्रारीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे आणी समुद्रपरचे पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार यांच्या बरोबर वजन काटा माप करणारे वैघ मापनशास्त्र विभागाचे वरिष्ठ निरिक्षक सनी मोरे, निरीक्षक प्रदिप झोडापे, कयूम शेख, हिंगणघाट विभागाचे निरीक्षक प्रशांत मेश्राम, सहाय्यक निरीक्षक प्रकाश चव्हाण यांनी श्री सुदर्शन जिनिंगचा वजन काटा तपासणी केली असता वजन काटा मध्ये मोठी अफरा तफर त्रुटी दिसुन आल्या. त्यामुळे सदर वाहन काट्याला सील करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here