Home latest News डोंबिवली घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी.

डोंबिवली घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी.

80

डोंबिवली घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी.

ठाणे :- डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घरी एकटी असताना परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ महिलेच्या घरात घुसला, धारदार शस्त्राचा धाक दाखवून महेशने महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. महिलेने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून लोक महिलेच्या घरासमोर जमा झाले. मात्र आरोपी महेशला बघून नागरिक पळून गेले. यातून महेश किती दहशत आहे हे दिसून येते. मात्र महिला घाबरली नाही. तिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन महेशच्या विरोधात तक्रार दिली. अखेर पोलिसांनी आरोपी महेश वाघला बेड्या ठोकल्या आहेत विशेष म्हणजे ही घटना शुक्रवारी  संध्याकाळी पाच वाजता घडली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज एकूण तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी जमली. मात्र, आरोपी सराई गुन्हेगार असून त्याची परिसरात दहशत आहे. त्यामुळे कुणीही महिलेच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत. अखेर महिलेने न भीता पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली.

या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वधाने यांनी माहिती दिली. “आरोपी महेश रमेश वाघ ऊर्फ मक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबदस्ती महिलेच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. त्याने धारधार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर अरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा सराईत गु्न्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालावा म्हणून सरकारने एक कडक कायदा आणला आहे. या कायद्यान्वे आरोपी विरोधात तातडीने कारवाई होणार आहे. मात्र, कडक कायदे आणूनही महिला विनयभंगाच्या घटना कमी होताना दिसत नाही. डोबिंवलीच्या घटनेत आरोपीला योग्य शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे