विदर्भ लिग २०२१- कराटे स्पर्धेत ब्रम्हपुरीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

राहुल भोयर ब्रम्हपुरी प्रतिनिधी मो 9421815114
ब्रम्हपुरी : -नुकताच काल, १९ डिसेंबर २०२१ रोजी रविवारला विदर्भ लीग कराटे चॅम्पियनशिप-२०२१ या स्पर्धेचे आयोजन मूल शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून जवळपास ६०० विद्यार्थांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये शिहान-गणेश लांजेवार ( इंडीया चीफ एक्झामीनर) यांचा मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन अंतर्गत ३५ विध्यार्थानी सहभाग घेतला होता. ब्रम्हपुरीच्या कराटे फाईटर विद्यार्थांनी उत्कृष्ट कामगिरी करत ६ सुवर्ण पदक,४ रजत पदक आणि ५ कांस्य पदक पटकाविले. तसेच ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीडच्या विद्यार्थांनी ३ सुवर्ण पदक, 1 रजत पदक, 2 कांस्य पदक पटकाविले. तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मुलींच्या गटात सेन्सेई क्रिष्णा समरीत यांनी द्वितीय क्रमांक पटकावून, चषक आणि रोख रक्कम प्राप्त केले. या सर्व विध्यार्थ्यांना प्रशिक्षक शिहान- गणेश लांजेवार, उदयकुमार पगाडे सर, सेन्सेई सचिन भानारकर, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या सर्व खेळाडूंना ट्विनकल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री.गणेश तर्वेकर सर, श्री-अजयजी काबरा( सचिव), मुख्याध्यापिका सौ- पोहेकर मॅडम, मुख्याध्यापिका – संगीता नारनवरे मॅडम यांनी अभिनंदन करून सर्व विध्यार्थना शुभेच्छा दिल्या.
*ह्या सर्व विध्यार्थ्यांमधून उत्कृष्ट खेळाडु तयार करण्यासाठी आणि यांना नेहमी मोलाचे मार्गदर्शन देण्याकरिता ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था ब्रम्हपुरी तसेच चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा नेहमी प्रयत्नशील असतो, हेच विशेष*