तालुक्यातील वाढत्या गौण खनिज चोरीला बसणार लगाम…?
अर्हेर- नवरगाव येथे गौण खनिज वाहतूक तपासणी नाका सुरु

अर्हेर- नवरगाव येथे गौण खनिज वाहतूक तपासणी नाका सुरु
✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :- तालुक्यात गौण खनिज चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी तत्परता दाखवत अर्हेर नवरगाव या रेती तस्करी साठी प्रसिद्ध बीटात मौजा अर्हेर येथे गौण खनिज वाहतूक तपासणी नाका सुरु केला आहे.
वैनगंगा नदी पात्रातील अर्हेर नवरगाव रेती घाटावरून अवैध रेती तस्करांनी वीणापरवाना रेती वाहतुकीचा सुरु केलेला चोरीचा सपाटा व तालुक्यातील विविध वृत्तपत्रा मध्ये झडकणाऱ्या रेती तस्करीच्या झणझणीत बातम्या बघता तालुका महसूल प्रशासनाची होत असलेल्या बदनामीने महसूल प्रशासन खळबळून जागे होत अर्हेर नवरगाव या मोक्याच्या ठिकाणावर गौण खनिज वाहतूक तपासणी नाका सुरु केले आहे.
तर अर्हेर-नवरगाव व्यतिरिक्त तालुक्यात इतर पाच ते दहा ठिकाणावरून सुद्धा रेती तस्करी मोठ्या प्रमाण होत असल्याने संबंधित ठिकाणाबाबत तहसीलदार ब्रम्हपुरी काय भूमिका घेतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी घेतलेल्या या भूमिकेने सर्व स्तरातून आता रेती तस्करीला आळा बसणार अशी आशा व्यक्त केल्या जात आहे मात्र प्रशासनाच्या प्रत्येक घटकाचा यात प्रामाणिक सहभाग महत्वाचा आहे अन्यथा “येरे माझ्या मागल्या” असा नेहमी घडणारा प्रकार होऊन निर्णय औट घाटकांचा ठरू नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे