शैक्षणिक जीवनात ध्येय निश्चित करून परिश्रमाची कास धरावी! सपोनि तेजस सावंत, पालांदूर येथे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात प्रबोधन.पालांदूर

54

शैक्षणिक जीवनात ध्येय निश्चित करून परिश्रमाची कास धरावी!

सपोनि तेजस सावंत, पालांदूर येथे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात प्रबोधन.पालांदूर

शैक्षणिक जीवनात ध्येय निश्चित करून परिश्रमाची कास धरावी! सपोनि तेजस सावंत, पालांदूर येथे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात प्रबोधन.पालांदूर
शैक्षणिक जीवनात ध्येय निश्चित करून परिश्रमाची कास धरावी!
सपोनि तेजस सावंत, पालांदूर येथे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात प्रबोधन.पालांदूर

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी :-वर्तमानातील शैक्षणिक जीवन हे स्पर्धात्मक आहे. स्पर्धेशिवाय विकास शक्य नाही. शैक्षणिक जीवनात /आयुष्यात उचित ध्येय निश्चित करून परिश्रमाची कास धरल्यास निश्चितच जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा उद्या मला काय करायचे आहे ,याचा आजच निश्चय करून त्या दिशेने पाऊल टाकणे अगत्याचे आहे.

असे मार्मिक व प्रबोधनात्मक मार्गदर्शन सपोनि तेजस सावंत पोलीस स्टेशन पालांदूर यांनी केले. ते पालांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात बोलत होते. मंचावर प्राचार्य हिवराज मडावी, प्राध्यापक युवराज खोब्रारागडे तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थी जीवन हे निरागस असते. कटिबद्ध साच्यात आयुष्य घडविण्याकरिता शाळा हे माध्यम आहे. आई वडीला नंतर गुरुजन हेच आपले मार्गदर्शक आहेत. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आयुष्यात बदल करीत सुसंस्कृत शैक्षणिक जीवन जगण्याकरिता प्रयत्न करावे. आईवडिलांची आपल्या प्रती असलेली स्वप्ने पूर्ण करण्याकरिता वेळीच मेहनत महत्त्वाची असते. वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा संधीचे सोने करीत आयुष्य घडविण्याचे प्रयत्न प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी करावे. असे आवाहन सुद्धा या वेळी ठाणेदार तेजस सावंत यांनी केले.

वर्तमानात पालांदूर परिसरात घडलेल्या दोन मोठ्या गुन्यात विद्यार्थी जीवनातील प्रसंग कारणीभूत ठरले. लैंगिक आकर्षणापोटी नाहक एकमेकांकडे आकर्षित होऊन असामाजिक घटना घडतात. घटना घडण्यापूर्वी त्या घटनेच्या परिणामाचा अभ्यास सुद्धा विद्यार्थ्यांना नसतो. वयानुसार नैसर्गिक रित्या मनात आलेली ती इच्छा विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गावर नेते. सायबर गुन्हा बाबत सुद्धा माहिती पुरविण्यात आली.शैक्षणिक जीवनात शिक्षका सोबतच थोरा मोठ्यांचे जीवनधडे अनुभवणे अर्थात अभ्यासणे खूपच महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत असलेली सुसंस्कृतता जपणे प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यावश्यक झाले आहे. पुस्तकातील अभ्यासासोबत संत साहित्य यांचाही अभ्यास घेऊन जीवनाला आकार देता येतो. भारतीय संस्कृतीत व शैक्षणिक क्षेत्रात नैतिकतेला खूप मोठे स्थान आहे. ही नैतिकताचं माणसाला सज्जन व मोठे करण्याकरिता सहकार्य करते. तेव्हा परिश्रमाची परी काष्टा करीत आयुष्य घडविण्याकरिता शिक्षकांनी सांगितलेल्या मार्गावर चालीत उचित ध्येय गाठण्याकरिता परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेततूनच प्रशासनात संधी मिळते. आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमातूनच स्पर्धा परीक्षेची तयारी साधावी. थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने ज्ञान संग्रहित करावा. ‘सामान्य ज्ञान’ वाचनाची सवय लावावी. दररोजची दैनिक वर्तमानपत्रे, साप्ताहिक, रोजगार समाचार आदींचे वाचन करावे. वाचन संस्कृती अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांनी दिलेल्या मार्गावर विद्यार्थ्यांनी चालावे. असे प्रबोधन सुरू असताना एका पाठोपाठ चार विद्यार्थिनींनी मी प्रशासनातील मोठा अधिकारी होईन, अशी सर्वांच्या समोर उभे राहून आत्मविश्वास जागवला. त्या विद्यार्थिनींना मार्गदर्शनातून ऊर्जा मिळाली. नवे काही करण्याची प्रेरणा तयार झाली. हीच प्रेरणा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. तेव्हा शिक्षक विद्यार्थी यांनी आप आपल्या कर्तव्यात राहून आपापली जबाबदारी प्रामाणिकतेने सांभाळली तर निश्चितच गाव खेड्यातही विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळायला अडचण जाणार नाही.

प्रा.युवराज खोबरागडे यांनी प्रास्ताविकातून ठाणेदार तेजस सावंत यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी प्रती असलेली आपुलकी त्यांच्या दैनंदिन उपक्रमातून कळते. पोलीस भरती करिता पोलीस ठाण्याच्या मैदानावर त्यांची नेहमीच सहकार्याची भूमिका असते. आमचे विद्यार्थी प्रयत्नशील असून यापूर्वीसुद्धा काही विद्यार्थी पोलीस सेवेत दाखल झालेले आहेत. पोलीस विभागाचे जिल्हा परिषद शाळेवर निश्चितच प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाबद्दल व मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. अशी प्रतिक्रिया प्राध्यापक युवराज खोब्रागडे यांनी दिली. प्राचार्य हिवराज मडावी यांनीसुद्धा ठाणेदार तेजस सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाची सुद्धा स्तुती केली. एक तासाच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी केलेले प्रश्न व त्यांना मिळालेले उत्तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा करता मार्मिक ठरतील अशी प्रतिक्रिया दिली. संचालन व आभार प्राध्यापक युवराज खोबरागडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहर्ष सहकार्य केले. नियमित प्रबोधनात्मक (मार्गदर्शनात्मक) कार्यक्रमाची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी अश्विनी कोचे व खुशी कोचे या दोघी बहिणी यांनी स्वागत गीत म्हटले, आभार प्रदर्शन संजयकुमार वासनिक यांनी केले