छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटने होणाऱ्या मतदानावर बहिष्कार

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512046
लाखणी :- आज दी. २०/१२/२०२१. सकाळी १०:वाजे छत्रपत्री संभाजी शेतकरी सेवा संघटना गुरढा ता.लाखणी जिल्हा भंडारा येथे संपूर्ण संघटनेचे पदाधिकारी,व ओबीसी समाज बांधव सभा घेण्यात आली होती.या सभे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेत मधील ओबीसी करीता राखीव जागाचे आरक्षण रद्द झाले. राजकीय पक्ष एकामेकावर खापर फोडण्यात व्यस्त आहे ओबीसी समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा राजकीय आरक्षण संपल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या मतदान होणार असून आम्ही सर्वानुमते आज या सभेत निर्णय घेवून मतदानावर बहिष्कार टाकत आहोत, जोपर्यंत राजकीय,शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक, ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना होणार नाही तोपर्यत आम्ही मतदान करणार नाही. कारण ओबीसी समाज अनेक वर्षांपासून लाचार गुलाम असून त्याची फक्त मात्र मतदान पूर्ती गरज भासत आहे. तेव्हा आम्हाला आमच्या संख्येनुसार आरक्षण नाही तर मतदान कशाला? केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. तेव्हा संघटनेच्या वतीने गुरढा,इसापूर, केसलवाडा, रेंगोळा, गोंडेगाव, कन्हेरी, येथे जावून मतदानावर बहिष्कार कण्याचा निर्णय घेण्यात आला.