मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या जाहीर..

49
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या जाहीर..

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या जाहीर..

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या जाहीर..
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

कर्जत :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत पुणे जिल्हा सरचिटणीस पदी रमेश घोजगे, मावळ विधानसभा मतदार संघ सहकार सेल अध्यक्षपदी सुधाकर मारुती वाघमारे, मावळ तालुका महिला अध्यक्ष पदी जयश्रीताई पवार, मावळ तालुका आध्यात्मिक व वारकरी आघाडी अध्यक्ष पदी योगेश पांडुरंग चोपडे, मावळ तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष पदी अक्षय नारायण मुऱ्हे. मावळ तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी नवनाथ ज्ञानेश्वर केदारी, उपाध्यक्ष पदी सोपान नथू गोंटे यांना नियुक्ती पत्र खासदार मा.अमोलजी कोल्हे साहेब, पुणे जिल्हाध्यक्ष मा.जगन्नाथ बापू शेवाळे, मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत,मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम मा.मंत्री मदन बाफनासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा मनोदय सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला.
यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे,मावळ तालुका युवक उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे, सुधाकर वाघमारे, शंकर मोढवे, योगेश करवंदे, पंकज भामरे, जितेंद्र कालेकर, नरेंद्र मुऱ्हे, सिद्धेश मुऱ्हे ,आकाश जगदाळे, प्रतीक मुऱ्हे,आकाश साळुंखे हे उपस्थित होते.