व्यसन म्हणजे काय?

165

एमबीबीएस, एमडी, मेंदू-मनोविकार व व्यसनमुक्तीतज्ज्ञ

मीडिया न्यूज़ वार्ता

एखाद्या गोष्टीचं व्यसन जडतं म्हणजे नेमकं काय होतं, याचं उत्तर कोणाकडेच नाही. एखादी व्यक्ती सतत दारु पिते, धूम्रपान करते म्हणजे ती व्यसनी आहे, असा सर्वसाधारण विचार प्रचलित आहे. यामुळे त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. व्यसन या शब्दाबद्दल अनेक गैरसमज असतात. नेमकं तथ्य काय हे जाणून घेऊयात.

‘मला दारुचं व्यसन जडलंय, दिवसातून एकदा तरी दारु प्यायल्याशिवाय मला राहवत नाही’, असे संवाद दारुचं व्यसन जडलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ऐकायला मिळतात. कारण व्यसनाच्या याच व्याख्या प्रचलित आहेत. कित्येक वर्षं व्यसनासंबंधित हेच समज आहेत. यात भरीस भर म्हणून टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांचं प्रेक्षक अंधानुकरण करतात. मुळात व्यसन या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या यासंबंधित अनेक गैरसमज प्रचलित आहेत तर असे गैरसमज आणि त्यामधील तथ्य जाणून घेऊयात…