#प्रशांत_जगताप
किती सहन करू मी
किती दा मरू मी.
ते भयंकर समाजाचा हलाहलाचे विषारी चटके
सहन करून किती किती दा मरू मी.
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!
जनु आज मला छेडण्याच्या
प्रत्येकाने विळाच घेतला,
अंधाराच्या काळोखात आज
कुठे उजेड बघू मी,
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!
आज मला जगण्याच धाडस नाही शरीरात,
आज दुखा:चा किती आलाप करू मी.
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!
जगण्याने छेडले आज मला,
आज त्या जगण्यालाचं सोडल मी.
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!
खुप काही सांगायच होत समाजाला.
पण शरिराने साथ सोडून दिली
माझा वरच अत्याचाराचं कारण पुढे आल.
तर तुम्ही अबोल्याने वेळ मारून नेली.
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!
आता मी सरनावर जाऊन
माझे विचार सांगते आहे.
काय गुन्हा माझा होता
मी हा प्रश्न प्रत्येकाला करते,
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!
राखड बनून ऊडुन जाईल मी आता,
या समाजालाला काही प्रश्न सोडुन मी जाईल आता,
किती सहन करू मी,
किती दा मरू मी !!