*वृद्ध शेतकऱ्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या*
जळगाव:- रावेर तालुक्यातील नेहता येथील वृद्ध शेतकऱ्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना सोमवारी पहाटे काढा बनवताना घडली. फकीरा तुकाराम वैदकर (वय ७३) या वृध्दाने पहाटे पती पत्नीत काही वाद सुरु होता याचच पर्यावसान हत्येत घडल.
रावेर तालुक्यातील नेहता येथील फकीरा तुकाराम वैदकर (वय ७३) या वृध्दाने पहाटे पती पत्नीत काही वाद झाल्याने संतापाच्या भरात पत्नी कमलाबाई (वय ६६) ह्या विद्युत शेगडीवर काढा बनवत असतांना तिच्या जबड्यावर व गळ्यावर तीक्ष्ण बख्खीच्या साह्याने वार केले. रक्ताचे थारोळ्यात कमलबाई या वीज पुरवठा सुरू असलेल्या शेगडीवर पडल्याने हात पाय झटकत असताना त्यांना हाताच्या कोपर्यावर, छातीवर व मांडीवर वायर व तप्त कॉईलचे चटके लागून त्या जागीच ठार झाल्या, तर वृध्दाने ती खोली बाहेरून बंद करून शेजारच्या खोलीत जावून आतून दरवाजा बंद करून कडीला दोरीच्या साहाय्याने स्वत: आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. नात कु हर्षाली ही दुध देण्यासाठी आली असता सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे, पो ना नंदकिशोर महाजन,महेंद्र सुरवाडे, पो कॉ भरत सोपे, पो कॉ सुरेश मेढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्र फिरवली आहेत.
वृद्ध हे पत्नीशी नेहमीच स्वयंपाकावरून वा या ना त्या कारणाने हुज्जत घालून संतापात बख्खीने छाटून टाकण्याची धमकी देत होते. अखेर त्या संतापाचे पर्यावसान आज पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या करण्यात झाले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे यांनी घटनास्थळी इन्क्वेस्ट पंचनामा करून त्यांचे दोन्ही मुले रवींद्र व गणेश वैदकर यांच्या जाबजबाबातून फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे. यावेळी सरपंच महेंद्र पाटील व पोलीस पाटील सरला शितल कचरे या उपस्थित होते.