हाथरस मधिल घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंतर्फे निषेध.
पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून जीभ कापन्यात आली व येथील सरकार आणी प्रशासनाने रात्रीच परीवाराच्या विरोध्य असतांना अंतिम संस्कार केला. सरकारच्या नाकर्तेपना मुळे तिला वेळेवर उपचार न मिळाल्याने या जातीयवादी व्यवस्थेचा मनीषा वाल्मिकी बळी ठरली.. या वृत्तीचा आणी या घटनेचा गुरुवारला राष्ट्रीय चर्मकार महासंचा वतिने नागपुरातील संविधान चौकात निषेध व्यक्त करीत सर्व अरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी एक दिवसीय धरना देण्यात आले.
या धरना प्रदर्शना मध्ये समाजसेविका निशा खान, किरण यादव, पल्लवी मेश्राम, मंगला वर्मा, मिना भागवतकर, अड. बबनराव, शशी हाजी मुबिन खान आणी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








