आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या लेकिची गळा आवळुन केली हत्या.

55

 आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या लेकिची गळा आवळुन केली हत्या.


सांगली:-  मध्ये एका जन्मदात्या मातेने आपल्या 2 दिवसाच्या मुलीचा गळा आवळल्याची सनसणीत घटना समोर आली आहे.
सांगली येथील सरकारी रुग्णालयामध्ये जन्मदात्या आईनेच 2 दिवसापूर्वी जन्मलेल्या गोंडस लेकीची स्वताः च्या हाताने गळा आवळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यात उपचारा दरम्यान बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सांगली येथील यलापूर येथे राहणाऱ्या सुमित्रा गंगाप्पा जुट्टी 30 सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, सुमित्राने 41 तासांपूर्वीच मुलीचा गळा आवळला. दरम्यान, रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेने हा धक्कादायक प्रकार पाहिला.

त्यानंतर परिचारिकांनी उपचाराकरता बाळाला तिच्या हातातून घेतले आणि पाहिले असता नवजात बालिकेच्या गळ्यावर हाताचे व्रण आढळले. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुमित्रा गंगाप्पा जुट्टी या आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पोटच्या मुलीचा गळा का आवळला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.