वर्धा तरुणांकडे मिळाला देशी कट्टा, लोकांत दहशत.

59

वर्धा तरुणांकडे मिळाला देशी कट्टा, लोकांत दहशत.
वर्धा जिल्हात गेल्या दीड महिन्यात सापडल्या तब्बल पाच बंदुका.

प्रतिनिधी

वर्धा :- आज कोरोना मुळे आज जिल्हातील जनतेच्या कामवर परीनाम झाला आहे. त्यामुळे आज युवा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे वर्धा जिल्हात अवैध हत्यार मोठ्या प्रमाणात मीळुन येत आहेत.

वर्धा येथील रामनगर परिसरात काल रात्री पुन्हा एका घरातून देशीकट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपीचे नाव शुभम लालसिंग ठाकूर रा. रामनगर असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने हा देशीकट्टा कुठून आणि कशासाठी आणला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रामनगर परिसरात शुभम ठाकूर याच्या घरी देशीकट्टा असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून ठाकूर यांच्या घराची पाहणी केली असता त्याच्या घराच्या सज्जावर देशी कट्टा मिळून आला. यावरून त्याला अटक करण्यात आली असून सदर बंदूक जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मेघाली गावंडे, गणेश राऊत, संदीप खरात, राहुल दुधकोहळे, लोभेश गाढवे यांनी केली.

दीड महिन्यात जिल्ह्यात सापडल्या पाच बंदुका
जिल्ह्यात बंदूक सापडण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून आले आहे. या दीड महिन्याच्या काळात पाच बंदुका मिळून आल्या आहेत. यात रामनगर येथे एक मिळून आली तर पुलगाव येथे दोन बंदुका मिळून आल्या. तर याच महिन्याच्या प्रारंभी हिंगदनगर येथे एक बंदूक जप्त करण्यात आली आहे.

गत महिन्याच्या शेवट सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील जंगलात एक बंदूक बेवारास स्थितीत मिळून आली होती. जिल्ह्यात एका वेळी एवढ्या बंदुका मिळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.