महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी.

65

महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

प्रदिप शिंदे प्रतिनिधी
भोकरदन:- तालूक्यातील मौजे कुंभारी येथील महर्षी वाल्मीक यांची जयंती आनंदी आणी उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
महर्षी वाल्मीक जयंती निमित्त लोकांनी महर्षी वाल्मीकीच्या फोटोला माल्यापर्ण करुन, महर्षी वाल्मीकने दिलेल्या विचारांना आत्मसात करून एक नविन पिढी निर्माण करण्याकरिता सर्वांनी त्यांना वंदन केले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र साळवे सोसायटी चेअरमन सूर्यकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य कृष्णा मुरकुटे, संतोष सहाणे,ज्ञानेश्वर जाधव, विठ्ठल जाधव, दिनेश जाधव, मधुकर जाधव व सर्व कोळी बांधव समस्त गावकरी इत्यादी उपस्थित होते