आईने आपल्या सात वर्षाच्या मुलाचा  केला खून; पतीला फसवून प्रियकरासोबत.

68

आईने आपल्या सात वर्षाच्या मुलाचा  केला खून; पतीला फसवून प्रियकरासोबत.

हमीरपूर :- उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एका आईने आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलासोबत असे वर्तन केले की सर्वांनाच धक्का बसला. आईला पोलिसांनी अटक केली आहे आणि तुरुंगात पाठविले आहे, जिथे तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सात वर्षाच्या निरागस हिमांशूच्या वडिलांविरुध्दही गुन्हा दाखल केला होता, परंतु हे प्रकरण काही वेगळेच निघाले.

काही दिवसांपूर्वी पोलिसांना राठ कोतवाली गावात गुरांच्या शेडमध्ये सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सात वर्षांच्या मुलाने त्याच्या आईला तिच्या मेव्हण्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. यानंतर मुलाने याबद्दल वडिलांकडे आणि आजोबांकडे तक्रार करेन असे तिला सांगितले. त्यानंतर तिला तिच्या बदनामीची भीती वाटायला लागली. यानंतर गोठयामध्ये महिलेने आपल्या मुलाचा गळा आवळून खून केला.

मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात लक्षात आले की मुलाची आईच खुनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा तिच्या मेहुण्याशी अनैतिक संबंध होते, ज्यामुळे अनेकदा सासरच्या लोकांमध्ये भांडण व्हायला लागली होती आणि या कारणास्तव, सुमारे 8 महिन्यांपूर्वी, या महिलेने सासर सोडले होते आणि सात वर्षांच्या निरागस मुलाला तिच्या पतीकडे सोडले होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा एका सात वर्षाचा निरागस मुलगा जेव्हा एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या मामाच्या घरी आला, तेव्हा त्याने आईला तिच्या मेव्हण्याबरोबर शारीरिक संबंध ठेवताना बघितले. या कारणास्तव, आईला बदनामीची भीती वाटली आणि तिने मुलाचा खून केला.