चाकूचा धाक दाखवून बापाचा 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मुंबईत नात्याला काळिमा.

71

चाकूचा धाक दाखवून बापाचा 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मुंबईत नात्याला काळिमा.

12 जूनपासून आपले वडील सातत्याने आपल्यावर बलात्कार करत असल्याचं तिने आईला सांगितलं. 12 जूनच्या रात्री तिचे वडील तिच्या खोलीत आले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कुणालाही सांगितल्यास उंच इमारतीवरून ढकलून देण्याची धमकीही त्यांनी तिला दिली होती.

गुणवंत कांबळे प्रतिनिधी

मुंबई:- वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एका जन्मदात्या पित्याने आपल्याच 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी पित्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुंबईतून या नराधम पित्याला अटक केली आहे. आरोपी मुंबईत एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. त्याची मुलगी उज्जैन येथील आपल्या आजोळी गेली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तिने मुंबईला परतण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने याबाबत तिला विचारणा केली.

तेव्हा या मुलीने एक भीषण गोष्ट सांगितली. 12 जूनपासून आपले वडील सातत्याने आपल्यावर बलात्कार करत असल्याचं तिने आईला सांगितलं. 12 जूनच्या रात्री तिचे वडील तिच्या खोलीत आले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कुणालाही सांगितल्यास उंच इमारतीवरून ढकलून देण्याची धमकीही त्यांनी तिला दिली होती.

मुलीच्या या जबाबानंतर तिच्या आईने स्थानिक पोलिसातधाव घेतली आणि तिच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. आरोपीने आपल्या घरात सीसीटीव्ही बसवून या पाशवी कृत्याचं चित्रणही केलं आहे, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. तसंच, आपला नवरा दारूच्या आहारी गेला असून आपल्याला मारहाण करत असे. तिने पोलिसात तक्रार केल्यानंतर तिची माफी मागून तो तिला घरी पुन्हा राहायला बोलवत असे. पण, तिला त्यानंतर मारहाण सुरूच होती, म्हणून ती माहेरी राहायला आली, असं तिच्या आईचं म्हणणं आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईतून आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता जबर मानसिक धक्क्यात असून हे प्रकरण आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.