प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलीने बापाला जाळले, आई आणि भावानेही दिली तरुणीला साथ.

59

प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलीने बापाला जाळले, आई आणि भावानेही दिली तरुणीला साथ.

उत्तर प्रदेश:– बदायूं जिल्ह्यात हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने तिच्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या बापाला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. बदायूं जिल्ह्यातील वजीरगंज भागातीतल हतरा गावात ही घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद आमीर असे असून ते 55 वर्षांचे आहेत, असं पोलिसांनी सांगितलंय. धक्कादायक बाब ही आहे की आमीर यांना जाळण्यामध्ये त्यांच्या बायकोने आणि मुलानेही तरुणीला साथ दिली होती. हे तिघेही जण फरार असून या घटनेची माहिती एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली होती.

पोलिसांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून माहिती देताना सांगितलं होतं की आमीर यांना त्यांच्या राहत्या घरात पेटवून देण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना आमीर भाजलेल्या अवस्थेत दिसून आले. आमीर यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं असता ते 50 टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. आमीर यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय.

पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये आमीर यांनी सांगितले की त्यांच्या मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध त्यांना मान्य नव्हते. यामुळे त्यांनी प्रेमसंबंधाला विरोध दर्शवला होता. यावरून त्यांच्यात आणि मुलीमध्ये वाद झाला होता. हा वाद सुरू असताना आपली मुलगी, मुलगा बायको आणि पुतण्या या चौघांनी आपल्यावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं असं आमीर यांनी सांगितलं आहे. पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की पोलिसांकडे अजून या प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आमीर यांच्या प्रकृतीवर पोलीस लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सिद्धार्थ वर्मा म्हणाले आहेत.